मुंबई, 23 मार्च- बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सौंदर्याबरोबरच फिटनेससाठीही ओळखल्या जातात. त्यांच्या फिटनेससाठी त्या नेमकं काय करतात हे जाणून घ्यायला त्यांचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. अशीच एक फिट अभिनेत्री आहे भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar). ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या भूमीच्या पहिल्याच चित्रपटांतील भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. तिनं या भूमिकेसाठी तिचं वजन 90 किलो इतकं केलं होतं. पण त्यानंतर मात्र भूमीनं तिचं वजन झपाट्यानं कमी करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
‘दम लगा के हैशा’ या चित्रपटात भूमीनं आयुष्मान खुरानाच्या जाड बायकोची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी भूमीला वजन वाढवावं लागलं होतं. पण त्यानंतर मात्र तिला वजन कमी करायचं होतं. हे एक आव्हानच होतं. पण तिनं प्रचंड मेहनत केली आणि काही महिन्यांतच जवळपास 32 किलो वजन कमी केलं. बाकी अन्य काही विचित्र न करता पण हेल्दी डाएट प्लॅनमुळे (Healthy Diet Plan) भूमीनं यशस्वीपणे वजन कमी केलं. आपल्या फॅन्ससोबत भूमीनं आपल्या खास सीक्रेट डाएट प्लॅनही शेअर केला आहे.
रोज सकाळी आपण एक ग्लास गरम पाणी आणि त्यानंतर डिटॉक्स वॉटर (Detox Water) घेत असल्याचं भूमीनं सांगितलं. डिटॉक्स पाण्यामुळे आपल्या शरीरातील दूषित पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात आणि शरीर स्वच्छ होतं असं तिनं सांगितलं. डिटॉक्स वॉटर म्हणजे पाण्यात लिंबू आणि पुदिन्याच्या पानांसह काकडी घातली जाते. एक लिटर पाण्यात 3 काकड्यांचे तुकडे, पुदिन्याची ताजी पानं आणि 4 लिंबाचे तुकडे घालून काही तासांसाठी तसंच फ्रीजमध्ये राहू द्या. भूमीनं तिच्या डिटॉक्स वॉटरची ही खास रेसिपी शेअर केली आहे. काही तासांनंतर हे पाणी तुम्ही पिऊ शकता.
हे पाणी प्यायल्यानंतर आपण घरी किंवा जिममध्ये एक्सरसाइज (Regular Exercise) अवश्य करत असल्याचं भूमीनं सांगितलं. जिममध्ये ती आलटून पालटून कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग (Cardio and weight Training) करते. तुम्ही जिमला जाऊ शकत नसाल तर घरीच योगा, फास्ट वॉक, स्क्वॉट नक्की करा, असं सल्ला भूमीनं चाहत्यांना दिला आहे. एक्सरसाईज केल्यानंतर प्रोटीनसाठी भूमी उकडलेली पाच अंडी खायची असं तिनं सांगितलं.
फक्त इतकंच नाही तर वजन कमी करण्यासाठी भूमी लंच काय करत असे तेही तिनं शेअर केलं आहे. लंचमध्ये ती घरी केलेलं जेवणंच करत असे. यामध्ये डाळ, भाजी, पोळी यांचा समावेश होता. फॅट नसलेल्या आणि हेल्दी पदार्थच आपण खात होतो असं भूमीनं स्पष्ट केलं. बाजरी, ज्वाररी, हरभरा किंवा नाचणीची भाकरी आणि त्यासोबत थोडंसं बटर किंवा लोणी लंचमध्ये ती खायची. भाजी ऑलिव्ह ऑईलमध्ये केलेली असायची. त्याशिवाय जेवणानंतर ती दही आणि ताक अवश्य घेत असे. लंचमध्ये आपण कधीकधी ग्रील्ड चिकन किंवा ग्रील्ड चिकन सँडविच खात असे असंही तिनं सांगितलं.
दुपारी लंचनंतर जवळपास 4.30 वाजता स्नॅक्स म्हणून भूमी पपई,सफरचंद किंवा पेरु खात असे. त्यानंतर थोड्या वेळाने ग्रीन टी आणि बदाम आणि अक्रोड खात असे. सध्यांकाळी 7.30 वाजता स्नॅक्समध्ये भूमी सलॅडशिवाय फळं आणि बेरीज खाते.
संपूर्ण दिवस वेळेवर आणि हेल्दी खाणं हे खूप महत्त्वाचं असतं. भूमीनंही हाच नियम पाळला होता. रात्री 8 वाजेपर्यंत ती डिनर करते. शाकाहारी जेवणात तती पनीर,टोफू, थोड्या वाफवलेल्या भाज्या आणि थोडासा ब्राऊन राईस खाते. रात्री पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शक्य तो अगदी हलकं जेवणं घ्यावं असं भूमी आवर्जून सांगते.वेळेवर आणि योग्य जेवण आणि नियमित व्यायाम यामुळे आपणही फिट राहू शकतो. भूमीनं सांगितलेली डाएट सिक्रेट्स फॉलो करायला मात्र विसरु नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhumi pednekar, Bollywood, Bollywood actress, Entertainment, Lifestyle