जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ठरलं! किम शर्मा-लिएंडर पेस लवकरच बांधणार लग्नगाठ, 'या' पद्धतीने पार पडणार विवाह

ठरलं! किम शर्मा-लिएंडर पेस लवकरच बांधणार लग्नगाठ, 'या' पद्धतीने पार पडणार विवाह

ठरलं! किम शर्मा-लिएंडर पेस लवकरच बांधणार लग्नगाठ, 'या' पद्धतीने पार पडणार विवाह

छोटा पडदा (Tv) असो किंवा बॉलिवूड (Bollywood) अनेक सेलिब्रेटी कपल लग्नाच्या बेडीत (Wedding Season) अडकत आहेत. तर असे अनेक सेलिब्रेटी कपल्स आहेत ज्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आणि ते लग्न कधी करणार हा प्रश्न त्यांच्या मनात आहे. त्यातीलच एक कपल म्हणजे टेनिस स्टार लिएंडर पेस (Leander Paes) आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) होय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,7 मे- छोटा पडदा  (Tv)  असो किंवा बॉलिवूड  (Bollywood) अनेक सेलिब्रेटी कपल लग्नाच्या बेडीत (Wedding Season) अडकत आहेत. तर असे अनेक सेलिब्रेटी कपल्स आहेत ज्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आणि ते लग्न कधी करणार हा प्रश्न त्यांच्या मनात आहे. त्यातीलच एक कपल म्हणजे टेनिस स्टार लिएंडर पेस (Leander Paes)  आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma)  होय. हे दोघेही गेली अनेक दिवस एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. आता त्या दोघांच्या नात्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. हे दोघेही पती-पत्नी बनण्यासाठी तयार आहेत. अर्थातच आता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार (Kim Sharma-Leander Paes wedding Report) असल्याचं म्हटलं जात आहे. किम शर्मा आणि लिएंडर पेस दोघेही लवकरच लग्न करून त्यांच्या नात्याची नवी सुरुवात करणार आहेत. या नवीन नात्यासाठी किम शर्मा आणि लिएंडर पेस यांना त्यांच्या पालकांचे आशीर्वाद मिळाले आहेत. या दोघांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच दोघेही लग्न करून पती-पत्नी बनण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे चाहत्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असल्याचं दिसत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हे लग्न इतर बॉलिवूड लग्नांसारखे शाही थाटामाटात होणार नाही. कारण किम आणि लिएंडर या दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचे कुटुंबिय किमच्या वांद्रे येथील घरी जमले होते.असं म्हटलं जात आहे. याचवेळी या दोघांच्या लग्नाचा निर्णय घेण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

News18

अभिनेत्री किमचं हे दुसरं आणि लिएंडरचं तिसरं लग्न असणार आहे. पहिलं लग्न यशस्वी न झाल्याने दोघेही आपापल्या जोडीदाराच्या घटस्फोटानंतर वेगळे झाले. किम शर्माने 2010 मध्ये बिझनेसमन अली पुंजानीसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 6 वर्षानंतर म्हणजेच 2016 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्याचवेळी लिएंडर पेस  अभिनेत्री महिमा चौधरीला डेट करत होते. हे नातं 2000 ते 2003 पर्यंत टिकले. यानंतर त्यांनी संजय दत्तची माजी पत्नी रिया पिल्लईसोबत लिव्ह इनमध्ये राहिले होते. काही काळानंतर दोघांनी लग्न केले होते.त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. पण 2014 मध्ये त्यांनी रियापासून घटस्फोट घेतला.त्यांनतर आता किम आणि लिएंडर नव्याने आपला संसार थाटण्यासाठी तयार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात