जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / '...तर मग हिंदीत तुमचे चित्रपट डब का करता?' साऊथ सुपरस्टारला अजय देवगणने सुनावलं!

'...तर मग हिंदीत तुमचे चित्रपट डब का करता?' साऊथ सुपरस्टारला अजय देवगणने सुनावलं!

'...तर मग हिंदीत तुमचे चित्रपट डब का करता?' साऊथ सुपरस्टारला अजय देवगणने सुनावलं!

Bollywood Vs South Cinema: आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर रंगलेली ही चढाओढ आता वादात रुपांतरीत होऊ लागली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने कन्नड सुपरस्टारला सोशल मीडियावरुन ‘हिंदी’ भाषेतून चांगलंच सुनावलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमा (Bollywood vs South Movies) यांची चढाओढ बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळते आहे. गेल्या काही महिन्यात तर दाक्षिणात्य सिनेमा हिंदी चित्रपटांपेक्षा वरचढ ठरला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ2’ या सिनेमांनी देशभरातील प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणलं आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर रंगलेली ही चढाओढ आता वादात रुपांतरीत होऊ लागली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने कन्नड सुपरस्टारला सोशल मीडियावरुन ‘हिंदी’ भाषेतून चांगलंच सुनावलं आहे. कन्नड अभिनेता किच्चा सुदीप (Kichcha Sudeepa and Ajay Devgan) याने हिंदी भाषेविषयी केलेल्या वक्त्यव्यावरुन अजय देवगणने ट्वीट करत त्याला सुनावलं आहे. काय म्हणाला अजय देवगण? अजय देवगणने ट्वीट केले आहे की, ‘किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मते जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही आहे मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीमध्ये डब करून प्रदर्शित का करता? हिंदी आमची मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती आणि नेहमी राहिल. जन गण मन’. अभिनेत्याने हिंदीमध्येच ट्वीट करत किच्चा सुदीपला सुनावलं आहे.

News18

काय म्हणाला होता किच्चा सुदीप? मीडिया रिपोर्ट्सनुसार, किच्चा सुदीप एका कार्यक्रमात म्हणाला होता की, हिंदी आता राष्ट्रभाषा राहिली नाही. पॅन इंडिया मुव्हीज बनवण्यासाठी बॉलिवूड आता स्ट्रगल करत आहे, तर साऊथ इंडस्ट्री पूर्वीपेक्षा यशस्वी होत आहे. KGF2 च्या यशासंदर्भात बोलताना त्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला यावेळी त्याला एक व्यक्ती म्हणते की पॅन इंडिया मुव्ही कन्नड भाषेत बनवण्यात आली आहे. त्यावर बोलताना सुदीप म्हणाला होता की, मला यात करेक्शन करायचे आहे. हिंदी आता राष्ट्रभाषा राहिली नाही. बॉलिवूड आता पॅन इंडिया मुव्ही बनवत आहे. ते तमिळ आणि तेलुगू चित्रपट डब करून यश मिळवण्यासाठी स्ट्रगल करत आहेत. तरीही ते यशस्वी होत नाही आहेत. आज आम्ही असे चित्रपट बनवत आहोत ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंदर्भात सुदीपचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा दावा मीडिया अहवालांमध्ये करण्यात आला आहे. अजय देवगणच्या टीकेनंतर सुदीपचे स्पष्टीकरण केवळ अजयच नाही तर सिनेसृष्टीतील अनेकांनी सुदीपच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान अजयच्या ट्वीटनंतर त्यावर रिप्लाय करताना सुदीपने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने म्हटले आहे की, ‘अजय देवगण सर, मी ज्या संदर्भात ते बोललो, मला वाटते की मी तो मुद्दा अगदी वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. कदाचित मी तुम्हाला भेटल्यावर माझा मुद्दा तुमच्यासमोर अधिक चांगल्या प्रकारे मांडू शकेन. कुणाच्याही भावना दुखावण्याचा, कुणाला भडकवण्याचा किंवा वाद सुरू करण्याचा माझा हेतू नव्हता. मी असं का करेन सर?’

News18

किचा सुदीपने आणखी एक ट्वीट करत म्हटले आहे की, ‘मी माझ्या देशाच्या प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय वाढवायचा नाही. मला तो इथेच संपवायचा आहे. मी म्हटल्याप्रमाणे माझ्या वाक्याचा संदर्भ पूर्णपणे वेगळा होता. खूप प्रेम आणि तुम्हाला शुभेच्छा. लवकरच भेटू अशी आशा आहे.’ सुदीपची अजयला कोपरखळी अजय देवगणच्या या ट्वीटला रिप्लाय दिल्यानंतर सुदीपच्या पाठिंब्यासाठी अनेक ट्वीट करण्यात आले आहेत. तर काहींनी अजय देवगणचा मुद्दा बरोबर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आणखी एक ट्वीट करत सुदीपने अजयला कोपरखळी मारली आहे.

News18

सुदीपने त्याच्या लेटेस्ट ट्वीटमध्ये असे म्हटलेआहे की, ‘आणि अजय सर, तुम्ही हिंदीत पाठवलेला टेक्स्ट मला समजला. त्याच कारण हेच की आपण सर्वांनी हिंदीचा आदर केला आहे, या भाषेवर प्रेम केले आहे आणि ती शिकलो आहे. नो ऑफेन्स सर, पण माझा रिप्लाय कन्नडमध्ये टाइप केला असता, तर काय होईल याबद्दल आश्चर्य वाटते. आम्ही पण भारताचेच नाही का सर?’ दरम्यान किच्चा सुदीपच्या ट्वीट्सची सीरिज अजून संपलेली नाही. त्याने आणखी एक ट्वीट केले आहे. अभिनेता अजय देवगण याने याच विषयासंदर्भात केलेल्या एका ट्वीटवर त्याने रिप्लाय दिला आहे. यात अजय असं म्हणतो आहे की, ‘Hi किच्चा सुदीप, तू मित्र आहेस. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. मी फिल्म इंडस्ट्रीला एक असल्याचे मानले आहे. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि सर्वांनी आमच्या भाषेचा आदर ठेवावा अशी अपेक्षा ठेवतो. कदाचित भाषांतरामध्ये काहीतरी गोंधळ झाला असावा.’

News18

अजयच्या या ट्वीटवर रिप्लाय देताना किच्चा सुदीप म्हणाला आहे की, ‘भाषांतर आणि लावलेला अर्थ हे दृष्टीकोन आहेत सर. हेच संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया न देण्याचे कारण आहे.  अजय देवगण सर मी तुम्हाला दोषी मानत नाही. पण एखाद्या क्रिएटिव्ह कारणासाठी तुमच्याकडून माझ्यासाठी ट्वीट आले असते तर कदाचित हा आनंदाचा क्षण ठरला असता. प्रेम आणि शुभेच्छा!’ किच्चा-अजयमधील या ट्विटर युद्धानंतर चाहत्यांच्याही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ट्विटरवर या मुद्द्यावर दोन प्रकारची मतं पाहायला मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात