जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आणखी एक लग्न आणि Happy Ending! येऊ तशी कशी मी नांदायला मालिका संपणार?

आणखी एक लग्न आणि Happy Ending! येऊ तशी कशी मी नांदायला मालिका संपणार?

आणखी एक लग्न आणि Happy Ending! येऊ तशी कशी मी नांदायला मालिका संपणार?

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Me Nandayla ) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 फेब्रुवारी- झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Me Nandayla ) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सततचे ट्वीस्ट आणि टर्नमुळे मालिका सोशल मीडियावर चर्चेत असते. शिवाय अनेकवेळा यामुळे मालिका ट्रोल देखील झाली आहे. आता लवकरच ही मालिका बंद होऊन या जागी नवीन मालिका सुरू होणार आहे. असं जरी असले तरी प्रेक्षकांना चिंता पडली आहे मालिकेचा शेवट (Yeu Kashi Tashi Me Nandayla Happy Ending  ) नेमका कसा असणार? म्हणजे happy ending होणार की आणि कसा शेवट होणार? यानुसार एक नवीन माहिती समोर आली आहे. मालिकेचा शेवट एका लग्नाने आणि गोड होणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार चिन्या आणि किंजलच्या लग्नाने मालिकेचा शेवट होणार आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड होणार आहे एवढे न क्की आहे.

जाहिरात

चिन्या स्वीटूचा भाऊ आहे. किंजलची मालिकेत काही दिवसापूर्वी एंट्री झाली आहे. यानंतर आता या दोघांचे लग्न होणार आहे. स्वीटू आणि ओमचे लग्नदेखील काही दिवसापूर्वीच झाले आहे. मालिकेत अनेक ट्वीस्ट दाखण्याता आले. काही ट्वीस्ट प्रेक्षकांना पचनी पडले नाही. यावरून मालिका अनेकवेळा ट्रोल झाली. असे जरी असले तरी या मालिकेतील स्वीटू आणि ओमची जोडी तितकीच लोकप्रिय ठरली. काहीजण फक्त या दोघांसाठी ही मालिका पाहत असत. आता या जोडीला प्रेक्षक नक्की मिस करणार एवढे मात्र खरे आहे. वाचा- BhabijiGharParHainला नेहा पेंडसेचा अलविदा, ‘ही’ अभिनेत्री साकारणार भाभीचा भूमिका आता नवीन आलेल्या प्रोमोमध्ये स्वीटूच्या घरच्यांनी तिला चिन्याच्या साखरपुड्यासाठी बोलावले आहे. मात्र सासुबाईंच्या तब्येतीमुळे स्वीटू साखरपुड्याला जाण्याचा निर्णय घेणार का नाही हे येणाऱ्या भागातच कळणार आहे,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात