मुंबई,21ऑक्टोबर- प्रसिद्ध बॉलिवूड
(Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूर
(Janhavi Kapoor) प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. 7 मार्च 1997 रोजी मुंबईत जन्मलेल्या जान्हवी कपूरने इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी चित्रपटांशी संबंधित कोर्स केला होता. हाच अभ्यासक्रम बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान
(Aryan Khan) यानेही केला आहे.
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. चाहतेही तिला भरभरून प्रेम देत असतात. ती अनेक ब्रँडचा चेहराही बनली आहे.आज आपण जान्हवी कपूरची शैक्षणिक स्थिती जाणून घेणार आहोत.
प्रारंभिक शिक्षण-
जान्हवी कपूरचे सुरुवातीचे शालेय शिक्षण मुंबईतूनच झाले आहे. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल आहे. बहुतेक स्टार मुलांनी मुंबईतील याच शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
(
हे वाचा:Sooryavanshi: चित्रपटाचं पहिलं गाणं 'Aila Re Aillaa'रिलीज)
विदेशात घेतलं अभिनयाचं शिक्षण-
जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी थिएटर आणि फिल्मसंबंधी कोर्स केला आहे.तिने हा अभ्यासक्रम अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे स्थित 'द ली स्ट्रॅसबर्ग थिएटर्स अँड फिल्म इन्स्टिट्यूट, लॉस एंजेलिस', येथून केला आहे. तसेच आर्यन खाननेसुद्धा अभिनयाचा हाच समान डिप्लोमा कोर्स देखील केला.
जान्हवी कपूरने 2018 मध्ये 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं.यामध्ये तिचा सह-अभिनेता म्हणून शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरने पदार्पण केलं होतं. या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांना फार पसंत पडली होती. त्यांनतर ती गुंजन सक्सेना, रुही यांसारख्या काही चित्रपटांत दिसली आहे. यापूर्वी त्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.