मुंबई,2 जून- बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तुम्ही दोघांनाही अनेकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहिलं असेल. आपल्या अभिनय कारकिर्दीत या दोघांनी ‘पाप का अंत’, ‘महा-संग्राम’, ‘इज्जतदार’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या चित्रपटांमध्येही त्यांची जोडी प्रचंड पसंत करण्यात आली होती. मात्र एक काळ असा होता जेव्हा गोविंदा ने माधुरी सोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. चला जाणून घेऊया काय आहे तो नेमका किस्सा. गोविंदा सध्या चित्रपटांमध्ये दिसून येत नाहीय. पण एकेकाळी तो इंडस्ट्रीत आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जायचा. आजही त्याची लोकप्रियता जशीच्या तशी आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक मोठे प्रोजेक्ट असायचे. तो दिवसातून तीन शिफ्टमध्ये काम करायचा. त्याने त्याकाळात अनेक बड्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. एकेकाळी गोविंदा आणि माधुरी दीक्षित यांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पाप का अंत, महा-संग्राम, इज्जतदार आणि बडे मियाँ छोटे मियाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची जोडी लोकांना आवडली होती.पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या हिट जोडीचे चित्रपट इतके कमी का आहेत. यामागे मोठं कारण लपलं आहे. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. Sonakshi Sinha B’day: सोनाक्षी सिन्हाने डेब्यूपूर्वी घटवलेलं 30kg वजन; वेट लॉससाठी तुम्हालाही उपयुक्त ठरतील ‘या’ गोष्टी माधुरी दीक्षितने जेव्हा तिच्या करिअरला सुरुवात केली तेव्हा गोविंदाने तिला खूप मदत केली. गोविंदामुळे माधुरीलाही ‘सदा सुहागन’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. चित्रपटाचं आऊटडोअर शूटिंगही झालं होतं. हाच काळ होता जेव्हा माधुरीने दिग्दर्शक सुभाष घई यांची भेट घेतली होती. जे त्यावेळी एक प्रसिद्ध दिग्दर्शक होते. सुभाषला त्यांच्या चित्रपटासाठी माधुरी खूप आवडली होती.त्यांनी माधुरीला ‘उत्तर-दक्षिण’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. अशा परिस्थितीत माधुरीने ‘सदा सुहागन’पेक्षा ‘उत्तर-दक्षिण’ चित्रपटात काम करणं पसंत केलं. आणि त्या चित्रपटात व्यग्र झाली. पण 1986 मध्ये आलेला सदा सुहागन हा चित्रपट सुपरहिट ठरला. तर ‘उत्तर-दक्षिण’ फ्लॉप ठरला. माधुरीच्या या निर्णयामुळे गोविंदाला खूप वाईट वाटलं होतं. आणि तो प्रचंड संतापला होता. माधुरीने आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, त्यावेळी आपण आपल्या करिअरसाठी जे योग्य वाटलं ते केलं. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर तिनेही तिच्या करिअरचा विचार केला असता, आणि मीही असाच काहीसा विचार केला. माझं काहीही चुकलं आहे असं मला वाटत नाही. नंतर माधुरीला ‘तेजाब’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला.
1989 मध्ये, जेव्हा गोविंदा आणि माधुरी दीक्षितला ‘पाप का अंत’ चित्रपटासाठी एकत्र काम करण्यासाठी साईन करण्यात आलं होतं. तेव्हा गोविंदाने स्पष्टपणे नकार दिला होता. एकतर तुम्ही मला ठेवा किंवा माधुरीला चित्रपटात ठेवा, असं त्याने स्पष्टपणे दिग्दर्शकाला सांगितलं होतं. मात्र, नंतर राजेश खन्ना यांनी गोविंदाला खूप समजावलं. आणि गोविंदा राजेश खन्ना यांचा प्रचंड मान राखत होता. त्यामुळे तो त्यांचं म्हणणं टाळू शकला नाही. यानंतर गोविंदाने माधुरीसोबत चित्रपटात काम करण्यास होकार दिला आणि या दोघांची जोडी पडद्यावर झळकली होती.