जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुपरस्टारच्या मोठ्या मुलाचे फिल्मी करिअर झाले फ्लॉप, आता धाकटा मुलगा देखील बॉलिवूडमध्ये आजमावणार नशिब

सुपरस्टारच्या मोठ्या मुलाचे फिल्मी करिअर झाले फ्लॉप, आता धाकटा मुलगा देखील बॉलिवूडमध्ये आजमावणार नशिब

सुपरस्टारच्या मोठ्या मुलाचे फिल्मी करिअर झाले फ्लॉप, आता धाकटा मुलगा देखील बॉलिवूडमध्ये आजमावणार नशिब

सुपरस्टारच्या मोठ्या मुलाचे फिल्मी करिअर झाले फ्लॉप, आता धाकटा मुलगा देखील बॉलिवूडमध्ये आजमावणार नशिब

आता करणचा धाकटा भाऊ आणि सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलही मोठ्या पडद्यावर नशीब आजमावणार आहे. राजवीर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 25 जुलै-**बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल याला आपल्या वडिलांप्रमाणे स्टार बनायचे आहे. करणला देखील आजोबा आणि वडिलांप्राणे बॉलिवूडमध्ये नाम कमवायचे आहे. पण करणचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला आणि त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपण्यात जमा झाली. आता करणचा धाकटा भाऊ आणि सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलही मोठ्या पडद्यावर नशीब आजमावणार आहे. राजवीर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्याही या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. चित्रपटाचे नाव ‘दोनों’ असं आहे. ही एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल दिसणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी पलोमाची निवड करण्यात आली आहे. राजवीर आणि पलोमाची केमिस्ट्रीही जोरदार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्रअद्याप सांगण्यात आलेली नाही. वाचा- ‘तू बाई कमी बाप्या जास्त दिसतेस…’;सोशल मीडियावरील टीकेला अर्चनाचं सडेतोड उत्तर तीन दशकांपूर्वी प्रथमच दिग्दर्शक सूरज आर. बडजात्याने 1989 ची अप्रतिम प्रेमकथा ‘मैंने प्यार किया’मध्ये सलमान खान आणि भाग्यश्रीला कास्ट केले. हा चित्रपट त्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपट होता. आता 2023 मध्ये सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस बडजात्या ‘दोनों’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. अवनीश या चित्रपटातून दोन नवीन चेहरे लाँच करत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

राजवीर हा अभिनेता सनी देओलचा धाकटा मुलगा आहे आणि पलोमा ही अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि निर्माता अशोक ठाकरे यांची मुलगी आहे. आज रिलीज झालेल्या टीझरमध्ये ‘दोनों’ या सिनेमाची एक झलक पाहायला मिळते. हा टीझर तुम्हाला निरागसपणा आणि रोमान्सची अनुभूती देईल. चित्रपटाची कथा एका लग्नाची आहे जिथे वधूचा मित्र देव (राजवीर) वराची मैत्रिण मेघना (पलोमा) ला भेटतो. टीझर भव्य लँडस्केप आणि भव्य लग्नाच्या दृश्यांनी भरलेला आहे. अवनीशने त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाच्या टीझरद्वारे एक आश्वासक नवोदित दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख करून दिली आहे.

गेले 75 वर्षे राजश्री प्रॉडक्शन हाऊस नवीन कलाकारांना लॉन्च करत आहे, हा वारसा आजही त्यांनी सुरू ठेवला आहे. या प्रॉडक्शन हाऊसने अशा किती तरी कलाकरांना कला सादर करण्याची संधी दिली आहे. राजश्री प्रॉडक्शन्स लिमिटेड जिओ स्टुडिओच्या सहकार्याने आपला 59 वा ‘दोनों’ हा चित्रपट सादर करत आहे. कमलकुमार बडजात्या, दिवंगत राजकुमार बडजात्या आणि अजितकुमार बडजात्या यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटासाठी क्रिएटिव्ह प्रोडक्शनचे प्रमुख सूरज आर. बडजात्या करत आहेत, हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात