मुंबई, 17 मे- प्रसिद्ध बॉलिवूड गायिका (Bollywood Singer) नेहा कक्करचा (Neha Kakkar Husband) पती रोहनप्रीतचा (Rohanpreet Singh) आयफोन, अॅपल वॉच आणि हिऱ्याची अंगठी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका हॉटेलमधून चोरीला गेली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी हॉटेलमध्येच काम करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मात्र, अद्याप चोरीला गेलेल्या वस्तू मिळालेल्या नाहीत. फूलचंद आणि दीपक अशी आरोपींची नावे असून दोघेही परप्रांतीय असून हॉटेलमध्ये किरकोळ काम करतात.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी चौकशी केल्यानंतर मंडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. दोघांनाही पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी या अटकेच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण-
रोहनप्रीतसिंह शुक्रवारी रात्री कुलू आणि मनालीला जात असताना मंडीच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मित्रांसोबत थांबला होता. रात्री झोपताना त्याने आपल्या काही महागड्या वस्तू काढून बेडच्या बाजूला असलेल्या एका टेबलवर ठेवल्या होत्या. पण सकाळी उठून पाहता त्याला आपल्या वस्तू त्याठिकाणी दिसून आल्या नाहीत. त्याने खोलीमध्ये बरीच शोधाशोध केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. खोलीतून हिऱ्याच्या अंगठ्या, अॅपल आयफोन, एअरपॅड चोरीला गेला आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याने पोलीस त्याचा गांभीर्याने तपास करत आहेत.
गेल्या वर्षी मंडी एसपी शालिनी अग्निहोत्री यांच्या घरातून सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेल्या होत्या. चोरीच्या या घटनेची खूप चर्चा झाली होती. त्या अंगठ्या नंतर सापडल्या असल्या तरी पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच चोरी झाल्यामुळे विभागासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. त्यांनतर आता गायिका नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंहसोबत चोरीचा प्रकार घडल्याने सर्वच चकित झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Neha kakkar, Playback singer