मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वजन कमी करण्यासाठी नेहा कक्करची धडपड; काय काय करतेय पाहा हा VIDEO

वजन कमी करण्यासाठी नेहा कक्करची धडपड; काय काय करतेय पाहा हा VIDEO

नुकताच नेहा कक्करने (Neha kakkar) इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (instagram video) शेयर केला आहे.

नुकताच नेहा कक्करने (Neha kakkar) इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (instagram video) शेयर केला आहे.

नुकताच नेहा कक्करने (Neha kakkar) इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (instagram video) शेयर केला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 एप्रिल : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका (bollywood singer) नेहा कक्कर (neha kakkar) आपल्या मधुर आवाजाने सर्वांच्याच मनावर राज्य करते. तिच्या अंदाजाचे लाखो चाहते आहेत. नेहा आपल्या अदांनी सर्वांचीच लाडकी बनली आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सतत वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या लॉकडाऊनमुळे (lockdown) ती घरीच आहे आणि आपल्या पतीसोबत हा वेळ एन्जॉय करत आहे. नुकतंच नेहाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (instagram video) शेयर केला आहे. त्यात ती वजन घटवण्यासाठी धडपडताना दिसते आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये नेहा आपल्या कारच्या पार्किंग एरियामध्ये कारला धरून पुशअप्स मारत आहे. त्याचबरोबर पार्किंगमध्ये रनिंग करत आहे. अशा पद्धतीचा व्हिडीओ मजेशीर कॅप्शनसह तिनं पोस्ट केला आहे. कॅप्शन मध्ये तिनं म्हटलं आहे. ‘आता वेळ आली आहे जादाचं वजन कमी करायची जे मी लॉकडाऊनमध्ये वाढवलं होतं. बघूया हे मी करू शकते की नाही'

यावर नेहाचा पती रोहनप्रीत सिंगने कमेंट करत म्हटलं आहे, 'कम ऑन.  हे तू करू शकतेस. तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. माझी राणी’ मात्र रोहनप्रीतच्या या कमेंटवर युझर्सनी त्याची खिल्ली उडवत त्याला ट्रोल केलं आहे. काहींनी कमेंट करत म्हटलं आहे. ‘हे तू तिलासुद्धा सांगू शकतोस यासाठी कमेंट करून सांगायची काय गरज आहे.

हे वाचा - OMG! ही सोनाक्षी सिन्हाच आहे की तिची डुप्लिकेट? PHOTOS पाहून वाटेल आश्चर्य

नुकतंच नेहा कक्करच्या भावाने म्हणजेच गायक टोनी कक्करने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात नेहा कक्करसहित संपूर्ण कुटुंब अगदी वेड्यासारखं डान्स करत होतं. कोण सोफ्यावर तर कोण डायनिंग टेबलवर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हे लोक टोनी कक्करच्या ‘तेरा सूट’ या गाण्यावर डान्सचा आनंद घेत होते. हे गाणं अभिनेता अली गोनी आणि जास्मिन भसीन यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Fitness, Neha kakkar, Singer neha kakkar