'सैराट' या चित्रपटातून संपूर्ण देशाला वेड लावणारे आर्ची आणि परश्या 'झुंड' च्या निमित्ताने पुन्हा एकत्र पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांमध्ये 'झुंड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर सतत एकत्र दिसून आले आहेत.
रिंकूने आकाश सोबतचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'प्रत्येक फोटोमध्ये माझे हावभाव वेगळे आहेत,आणि हा मुलगा एकच आहे'.# FriendsForever
'सैराट' या चित्रपटामुळे रिंकू आणि आकाश एका रात्रीत स्टार बनले होते. सध्या त्यांच्यात फारच बदल झालेला पाहायला मिळत आहे.