या करण-अर्जून जोडीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे
मोठ्या पडद्यावर शाहरुख खान पुन्हा कधी कमबॅक करणार याची प्रतीक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे. अशी बातमी समोर येते आहे की शाहरुख खान (Shahrukh Khan) आता भाईजान सलमान खान (Salman Khan)बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
करण-अर्जूनची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. अशी चर्चा आहे की, शाहरुखचा अपकमिंग सिनेमा 'पठान' (Pathan) मध्ये सलमानचा कॅमिओ असणार आहे.
दीर्घकाळापासून शाहरुख कोणता सिनेमा त्याच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला नाही आहे. त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टबाबतही कोणतीही ठोस माहिती अद्याप हाती लागली नाही आहे. मात्र सध्या बीटाऊनमध्ये या चर्चांना उधाण आले आहे की शाहरुख लवकरच शूटिंग सुरू करणार आहे. मुंबई मिररच्या एका अहवालानुसार शाहरुख सलमान एकत्र दिसणार आहेत.
अहवालानुसार यशराज फिल्म्स स्टूडिओमध्ये सिद्धार्थ आनंदच्या 'पठान'चं शूटिंग होणार आहे. शाहरुखचे अॅक्शन सीन देखील यामध्ये असणार आहेत, तर सलमानाचा कॅमिओ असणार आहे.
याआधी सलमानने शाहरुखच्या 'झिरो'मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. दोन्ही कलाकार एकमेकांच्या सिनेमात स्पेशल अपिअरन्स करत असतात. सलमानने शाहरुखच्या 'कुछ-कुछ होता है' आणि 'ओम शांति ओम' मध्ये खास भूमिका केली होती. तर शाहरुखने 'ट्यूबलाइट', 'हर दिल जो प्यार करेगा' मध्ये पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केली होती.
शाहरुखच्या कमबॅकची चाहत्यांना उत्सुकता आहे कारण तो शेवटच्या 'झिरो' या सिनेमात दिसला होता. झिरो बॉक्स ऑफिसवर तितकाचा चालला नव्हता. यामध्ये त्याने अनुष्का आणि कतरिना कैफबरोबर स्क्रीन शेअर केली होती.
'पठान' हा सिनेमा सिद्धार्थचा आधीचा चित्रपट 'वॉर' प्रमाणेच एक स्टायलिश रिव्हेंज ड्रामा असणार आहे. त्यात यामध्ये आता सलमान असणार अशा चर्चा देखील होत असल्याने चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे