Home /News /entertainment /

Rohit Shetty च्या कॉप युनिव्हर्समध्ये अजय, रणवीर, अक्षयनंतर आता हा अभिनेता; याआधी हिट ठरली आहे 'कारगिल हिरो'ची भूमिका

Rohit Shetty च्या कॉप युनिव्हर्समध्ये अजय, रणवीर, अक्षयनंतर आता हा अभिनेता; याआधी हिट ठरली आहे 'कारगिल हिरो'ची भूमिका

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’, ‘सिंबा’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांनी वाहवा मिळवली. आता या कॉप युनिव्हर्समध्ये रोहित शेट्टी आणखी एक नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे, या नव्या प्रोजेक्टसह त्याने ओटीटी डेब्यूची (Rohit Shetty OTT Debut) तयारी केली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 20 एप्रिल: दिग्दर्शक रोहित शेट्टी स्टंट, अ‍ॅक्शन, ड्रामा, गाड्या असं (Rohit Shetty Upcoming Project) पुरेपूर मनोरंजन असणाऱ्या सिनेमासाठी ओळखला जातो. याशिवाय त्याने 'कॉप युनिव्हर्स' (Rohit Shetty Cop Universe Movies) अर्थात पोलिसांवर आधारीत बऱ्याच मुव्हीज केल्या आहेत. ‘सिंघम’, ‘सिंबा’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांनी वाहवा मिळवली. आता या कॉप युनिव्हर्समध्ये रोहित शेट्टी आणखी एक नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे, या नव्या प्रोजेक्टसह त्याने ओटीटी डेब्यूची (Rohit Shetty OTT Debut) तयारी केली आहे. रोहित शेट्टीने मंगळवारी त्याच्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत या प्रोजेक्टमध्ये कोण असणार याची माहिती रोहित शेट्टीने दिली आहे. रोहित शेट्टीच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra and Rohit Shetty) ​​​​पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थने देखील याबाबत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शेअर केलेल्या फोटोत पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीत अभिनेता पाहायला मिळत आहे. या फोटोत त्याच्यासमोर गाड्यांचा ताफा देखील उभा आहे. रोहित शेट्टीने हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, 'अ‍ॅक्शन उद्यापासून 11.00 वाजता सुरू होईल'. तर सिद्धार्थ मल्होत्राने देखील हा फोटो शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, 'रोहित शेट्टीचे कॉप युनिव्हर्स उद्यापासून 11 वाजता डिजिटल होणार आहे.'
  सिद्धार्थ मल्होत्रा आणि रोहित शेट्टीने पोस्ट केलेल्या या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यांनी सिद्धार्थच्या लुकचं आणि रोहित शेट्टीच्या नव्या सिनेमाचं कौतुक केलं आहे. तर चाहते देखील सिद्धार्थला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये, पिंकविलाने एका सूत्राच्या हवाल्याने अशी माहिती दिली होती की, रोहित शेट्टी आणखी एक कॉप ड्रामा बनवण्याच्या विचारात आहे, ज्यासाठी सिद्धार्थ मल्होत्राशी चर्चा सुरू आहे. याशिवाय रोहित शेट्टी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही एक पोलिसांवर आधारित सीरिज असेल, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी 'शेरशाह'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत दिसला होता. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood, OTT, Rohit Shetty, Sidharth Malhotra

  पुढील बातम्या