‘मोहब्बत्तें’ फेम अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी नुकताच जुहूच्या एका सलूनमध्ये जाताना दिसून आली. यावेळी तिने डेनिम आणि टीशर्ट परिधान केला होता. तिचा पार्लर बाहेरील हा व्हिडीओ विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केलं जातं आहे. ‘जीजू जेलमे और साली सलून में’ असं म्हटलं जातं आहे. (हे वाचा:.आणि प्राण वाचले! शुटींगदरम्यान भयानक अपघातातून थोडक्यात बचावले मिलिंद शिंदे ) राज कुंद्रा प्रकरण पुढे घेत एका युजरने म्हटलं आहे, ‘भाऊजींच्या पैशांवर चैनी करते, आज तो जेलमध्ये आहे. आणि मेहुणी पार्लरला जात आहे’. तिला काही फरक नाही पडत की तो जेलमध्ये आहे. राज कुंद्रा तिला लॉन्च करण्याच्या तयारीत होता आणि ही..’. अशा आशयाच्या अनेक कमेंट्स शमिताच्या व्हिडीओवर येत आहेत. एक दोन नव्हे तर अनेक युजर्सनी अशा पद्धतीच्या कमेंट्स करत शमिताला ट्रोल केलं आहे. (हे वाचा: याच दिवशी अमिताभ बच्चन यांना मिळालं होतं नवं आयुष्य; 'कुली' अपघाताची 39 वर्षे) नुकताच अभिनेत्री आणि राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीने नुकताच जाहीर केलं आहे, की पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी केसवर तिने अजून कोणतही भाष्य केलेलं नाहीय. किंवा कोणतच स्टेटमेंट दिलेलं नाहीय. तसेच पुढेही याविषयावर ती मौन बाळगणार आहे. तेव्हा तिच्या बाजूने कोणताही विधान कोणीही करू नये’ असं तिनं स्पष्ट केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj kundra, Shilpa shetty