बॉलिवूड क्वीन कंगना रणौतवर चोरीचा गंभीर आरोप; वाचा नेमकं प्रकरण काय आहे?

बॉलिवूड क्वीन कंगना रणौतवर चोरीचा गंभीर आरोप; वाचा नेमकं प्रकरण काय आहे?

बॉलिवूड क्वीन (Bollywood queen) कंगना रणौतने (kangana ranaut) मणिकर्णिका (manikarnika) या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा नुकतीच केली आहे. पण यानंतर लगेचच तिच्यावर एक गंभीर आरोप केला जात आहे

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी: बॉलिवूड क्वीन (Bollywood queen) कंगना रणौतने (kangana ranaut) मणिकर्णिका (manikarnika) या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा नुकतीच केली आहे. 'पंगा गर्ल' लवकरच 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिद्दा' (Manikarnika Returns: The Legend of Didda) या चित्रपटात दिसणार आहे. मणिकर्णिकामध्ये कंगनाने झाशीच्या राणीची भुमिका निभावली आहे. पण मणिकर्णिकाच्या पुढील भागात कंगना काश्मीरची राणी 'दिद्दा'ची भुमिका निभावणार आहे. पण चित्रपटाच्या घोषणेनंतर कंगनावर चोरीचा (Copyrights) आरोप झाला आहे. कंगनाने या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप 'दिद्दा'चे लेखक आशिष कौल (Writer ashish kaul) यांनी केला आहे.

आशिष कौल यांनी कंगना रणौत यांच्यावर कॉपीराइटचा आरोप केला आहे. एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, स्वतः च्या हक्कांसाठी संघर्ष करणारी कंगना माझ्यासारख्या लेखकाच्या हक्कांचं उघडपणे उल्लंघन करत आहे. लेखक कौल पुढे म्हणाले की, कंगनाने कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केलं असून हे बेकायदेशीर आहे. तिने देशातील आयपीआर आणि कॉपीराइट कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन केलं आहे.

(हे वाचा- फॅशनपेक्षा Comfort Zone महत्त्वाचा! देसी गर्लने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops)

त्यांनी पुढं सांगितलं की, 'मला कंगनाचं वागणं समजलं नाही. मी याला बौद्धिक चोरी म्हणेल. आशिष म्हणाले की, कंगना हा दावा करू शकते की 'दिद्दा' हे एक ऐतिहासिक पात्र आहे. परंतु दिद्दा बद्दल जगातील कोणत्याही इतिहासकारांनी फारसं काही लिहीलं नाही. याला फक्त अपवाद फक्त इतिहासकार कल्हान आहेत. इतर कोणत्याही इतिहासकारानं काश्मीरची राणी दिद्दावर मोजून दोन पानंही लिहिली नाहीत. या विषयावर मी सहा वर्षे संशोधन करून ही माहिती जमवली आहे.

कंगना रणौतने गुरुवारी 'मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा' हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. कंगना हा चित्रपट फिल्म निर्माते कमल जैन यांच्यासोबत बनवणार आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की, 'आपला भारतवर्ष झाशीच्या राणीसारख्या कित्येक बहाद्दूर महिलांच्या कथेचा साक्षीदार राहिला आहे. अशीच आणखी एक वीरांगना म्हणजे काश्मीरची राणी दिद्दा, जिने महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केलं आहे.'

Published by: News18 Desk
First published: January 15, 2021, 1:38 PM IST

ताज्या बातम्या