मुंबई, 31 मार्च- 60 च्या दशकात अभिनेत्री विद्या सिन्हा यांच्या सुंदरतेचे अनेक दिग्दर्शक फॅन होते. साधी सरळ आणि तितक्याच प्रेमळ दिसणाऱ्या विद्या यांनी राज काका या सिनेमातून डेब्यू केला होता. विद्या यांची जोडी त्याकाळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यासोबत बनली होती. अमोल पालेकर यांच्यासोबत त्यांनी ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ तर संजीव कुमार यांच्यासोबत ‘पति-पत्नी और वो’ आणि विनोद खन्ना यांच्यासोबत इनकार’ यासारखे लोकप्रिय सिनेमे केले आहेत. विद्या यांनी ग्लॅमरस आयुष्य जगल्या मात्र तितकीच त्यांची पर्सनल लाईफ चर्चेत राहिली. त्यांना पर्सनला लाईमध्ये खूप धक्के खावे लागले.
15 नोव्हेंबर 1947 रोजी मुंबईत जन्मलेल्या विद्या यांनी वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस बॉम्बे'चा किताब जिंकला होता. मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या विद्या यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन सलग अनेक हिट सिनेमे दिले. मात्र विद्या यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच लग्न केले होते.
शेजाऱ्यावर जडला जीव आणि मग त्याच्याशीच बांधली लग्नगाठ
खरं तर विद्या सिन्हा मॉडेलिंग करत असताना त्यांचा शेजारी असलेला तमिळ ब्राह्मण वेंकटेश्वर अय्यरच्या प्रेमात त्या पडल्या. 1968 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि दोघेही सुखी आयुष्य जगू लागले. लग्नाच्या काही वर्षांनी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. पण नियतिच्या मनात काही वेगळंच होतं. नवरा इतका आजारी पडला की, त्यांचं निधन झालं.
वाचा-न्यासा-सुहानावर भारी पडली अर्जुन रामपालची लेक; इतक्या लहान वयात करतेय रॅम्पवॉक
विद्या यांनी नवऱ्याची खूप सेवा केली होती. त्यांचं नवऱ्यावर अपार प्रेम होतं. विद्या यांना हा धक्का सहन झाला नाही. मग ही अभिनेत्री सर्वांपासून काहीशी अंतर ठेऊनच राहू लागली. यानंतर त्या सिडनीला गेल्या, सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन डॉक्टर भीमराव साळुंके यांच्याशी त्यांची ऑनलाइन भेट झाली. दोघांच्यातील संभाषण वाढलं तेव्हा दोघंही एकमेकांना पसंत करू लागले. आयुष्यात पुन्हा प्रेमात पडल्यानंतर विद्या यांनी 2001 मध्ये मंदिरात दुसरं लग्न केले.
काही काळानंतर विद्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे नाराज राहू लागल्या. विद्या यांनी काही काळानंतर नवऱ्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत 2009 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले आणि मोठ्या भांडणानंतर च्यांचा घटस्फोट झाला. तब्बल 25 वर्षांनंतर विद्या पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर आल्या आणि त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. विद्या यांनी 'कुबूल है', 'इश्क का रंग सफेद', 'चंद्रा नंदिनी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment