आज 16 ऑगस्टला सैफ अली खान 51वा वाढदिवस (Celebrating 51th Birthday) साजरा करत आहे. सैफ अली खानचा जन्म दिल्लीत झाला होता. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन मंसूर अली खान पटौदी यांचा हा मुलगा. सैफ आपल्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफबाबतही सतत चर्चेत असतो.
सैफ अली खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंह यांच्यात 12 वर्षांचं अंतर होतं. सैफ, अमृताहून 12 वर्ष लहान होता. या दोघांची पहिली भेट 'ये दिल्लगी' च्या सेटवर झाली होती.
त्यानंतर काही वर्षांनी सैफ आणि अमृता यांचे मार्ग वेगळे झाले. काही वर्षांनी सैफ आणि करीना यांची पहिली भेट 2008 मध्ये दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांच्या 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगवेळी झाली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही, पण करीना आणि सैफसाठी मात्र हा चित्रपट नक्कीच खास ठरला.
सैफ अली खान आणि करीना कपूर काही वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या वर्षात करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जहांगीरला जन्म दिला. त्याच्या नावावरुनही हे दोघे वादात अडकले होते.
सैफ अली खान आणि करीना कपूर दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर आपल्या लग्नाबाबत माध्यमांमध्ये माहिती दिली.
करण जोहरच्या शोमध्ये एकदा सारा अली खानसह आलेल्या सैफने सांगितलं, की करीनाशी लग्न करण्याच्या दिवशी त्याने पहिल्या पत्नीला अमृताला एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत पुढील आगामी आयुष्यासाठी त्याने शुभेच्छा मागत, दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचं सांगितलं होतं. (फोटो सौजन्य: kareenakapoorkhan/Instagram)
करीनाने सैफशी लग्न करण्याआधी ठेवलेल्या अटीबाबत तिने अनेकदा सांगितलं आहे. तिने लग्नापूर्वी एक अट ठेवली होती.
मी तुझी पत्नी आहे आणि मी नेहमी काम करत राहीन, पैसे कमवेन आणि त्यासाठी मला आयुष्यभर सपोर्ट हवा असल्याची अट करीनाने सैफकडे ठेवली होती.