महिला क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाब्बास मिथू’ हा चित्रपट जुळी महिन्यात रिलीज होणार आहे. यात तापसी पन्नू भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या कॅप्टनची भूमिका साकारणार आहे. मिताली राजने नुकतीच तिच्या करिअरमधून रिटरमेंट घेण्याबद्दल घोषणा केली.
भारतीय महिला क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित ‘छकडा एक्सप्रेस’ चित्रपटात अनुष्का शर्मा झुलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासाठी ती क्रिकेटचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम एस धोनी’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका लीलया पेलली होती.
1983 च्या वल्ड कपची गाथा सांगणारा 83 हा चित्रपट आणि रणवीर सिंगने साकारलेली कपिल देव यांची भूमिका दोघांचं विशेष कौतुक झालं होतं
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘शिन ए बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाचं सुद्धा विशेष कौतुक झालं होतं.