प्रसिद्ध फिल्मी जर्नलिस्ट भावना सोमया यांनी इरफानची ही आठवण शेयर केली आहे. 90 च्या दशकात इरफान छोट्या पडद्यावर कार्यरत होता. त्यावेळी तो एक क्राईम सिरीज करत होता. छोट्या पडद्यावरचं शुटींग इतक जास्त असायचं की त्यासाठी रात्रंदिवस शूट कराव लागायचं. असचं एका दिवशी इरफान आपल्या शूट वरून परतत होता. तो शुटींगने इतका थकला होता, की त्याला कार चालवताना झोप येत होती. आणि एक क्षण असा आला की इरफानला झोप कंट्रोल करणं शक्य झालं नाही. आणि कार चालवता चालवता त्याला कारच्या स्टेअरिंगवरचं झोप लागली. (हे वाचा: खासदार होण्यापूर्वी नवनीत राणा झळकल्या होत्या दाक्षिणात्य चित्रपटांत, पाहा PHOTO ) इरफानने ज्यावेळी डोळे उघडले तेव्हा त्याला काही समजत नव्हत मात्र सूर्याची किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडत होती. अशाचं अवस्थेत तो घरी पोहचला. आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. या सर्व प्रकाराने इरफान खूपच अस्वस्थ झाला होता. घाबरला होता. आणि सोबतचं गोंधळून गेला होता. त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की या प्रकारामुळे तो कित्येक दिवस त्याच्या खोलीतून बाहेर निघत नव्हता. त्यावेळी इरफानने ठरवलं, काम नसेल तरी चालेल. मात्र छोट्या पडद्यावर परत काम करायचं नाही. त्यामुळे इरफानने छोट्या पडद्याला रामराम केल होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Irrfan khan