प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि खासदार नवनीत कौर राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र त्यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाहीय.
2/ 8
मुंबई हायकोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल आहे. इतकच नव्हे तर त्यांच्यावर 2 लाखांचा दंडसुद्धा ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकीसुद्धा संकटात येऊ शकते.
3/ 8
नवनीत राणा या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत यश मिळवलं होतं.
4/ 8
मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे की नवनीत राणा या राजकिय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री होत्या.
5/ 8
सन 2005 मध्ये आलेली, 'चेतना द एक्साइटमेंट' नवनीत राणा झळकल्या होत्या. त्यामध्ये त्या खूपच बोल्ड अंदाजात होत्या.
6/ 8
2007 मध्ये ज्युनियर एनटीआरच्या 'यमडोंगा' या चित्रपटातसुद्धा त्या एका छोट्याशा रोलमध्ये झळकल्या होत्या. तसेच त्या मल्याळम चित्रपट ममूटी आणि लव्ह इन सिंगापूर मध्येसुद्धा दिसून आल्या होत्या.
7/ 8
रामदेव बाबांच्या एका शिबिरात नवनीत राणा आपल्या पतींना भेटल्या होत्या. त्यांचे पती रवी राणा एक आमदार आहेत.
8/ 8
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांचं म्हणणं होतं की, त्यांच्या फोटोंसोबत छेडछाड करून ते त्यांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत.