मुंबई, 7 जानेवारी- दिवंगत बॉलिवूड (Bollywood) अभिनेता इरफान खानला (Irrfan Khan) अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखलं जातं. आज तो या जगात नसला तरी चाहते त्याच्या चित्रपटातून त्याची आठवण काढत असतात. त्याच्या दमदार अभिनयाचे कोट्यावधी चाहते आहेत. त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याने विविध भूमिका साकारत आपलं वैशिष्ट्य सर्वांना दाखवून दिलं आहे. आज इरफान खानची बर्थ ऍनिव्हर्सरी (Irrfan Khan 55 th Birth Anniversary) आहे. यानिमित्ताने आपण त्यांच्या पत्नी सुतापा यांनी सांगितलेली एक भावुक आठवण आपण पाहणार आहोत. इरफान खान यांच्या पत्नी सुतापा (Sutapa Khan) आणि मुलगा बाबिल (Babil) सतत सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या आठवणी शेअर करत असतात. आज इरफान खानची 55वी बर्थ ऍनिव्हर्सरी आहे. यानिमित्ताने चाहते व त्यांच्या जवळचे लोक त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.तसेच त्यांची पत्नी सुतापा यांच्यासाठीसुद्धा हा फार भावुक क्षण आहे. त्यांनी आपल्या पतीच्या आठवणीत फेसबुकवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, की त्यांनी आपले दिवंगत पती इरफान खान यांच्या आठवणीत एक रातराणीचं रोप लावलं आहे. यामागे कारणही फार विशेष आहे. इरफान खानला फुलांचा सुगंध प्रचंड आवडत होता. यामुळे त्यांच्या आठवणीत सुतापाने हे रोप लावलं आहे. सुतापा यांनी इरफान खानच्या शेवटच्या क्षणांतील आठवणी शेअर केल्या आहेत. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, की मृत्यूच्या आदल्या रात्री इरफानला त्यांनी गाणी गाऊन दाखवली होती. पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत सुतापा यांनी सांगितलं, की इरफानला त्यांना कोणकोणती गाणी ऐकवली होती. सुतापा पुढे म्हणाल्या, मी ज्यावेळी गाणी ऐकवत होते, त्यावेळी ते बेशुद्ध होते. ते काहीही बोल्ट नव्हे परंतु डोळे उघडे होते. ते मला ऐकू शकत होते. ते काहीही बोलत नव्हते. परंतु गाणी ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते’. (हे वाचा:
Selfie 4 SSR’ म्हणत सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने शेअर केला VIDEO
) सुतापा म्हणाल्या, ‘मी इरफानला उमराव जानमधील अमरैया झूले मोरा सैंया’, लग जा गले, कि फिर ये हंसी रात हो ना हो, आज जाणे कि जिद ना करो’. ही गाणी ऐकवली होती. मी गाणं म्हणताना त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या’. तब्बल २ वर्षांपूर्वी म्हणजेच २९ एप्रिलला इरफान खानचं निधन झालं होतं. त्याने दोन वर्षे कॅन्सरशी झुंज दिली होती.परंतु ही झुंज अपयशी ठरली. त्यांनतर आता इरफान खानचा मोठा मुलगा बाबिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तो लवकरच ‘काला’ मधून अभिनयात पदार्पण करणार आहे. त्याच्याकडे आणखीही काही चित्रपट आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.