मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Irrfan Khan 1st Death Anniversary: इरफानला माहित होतं तो मरण्यासाठी जात आहे, मुलगा बाबीलने केला खुलासा

Irrfan Khan 1st Death Anniversary: इरफानला माहित होतं तो मरण्यासाठी जात आहे, मुलगा बाबीलने केला खुलासा

आजच्या दिवशी वर्षभरापूर्वी बॉलिवूडचा 'मकबूल' इरफान खान (Irrfan Khan) हे जग सोडून गेला. मात्र आजही त्याच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही.

आजच्या दिवशी वर्षभरापूर्वी बॉलिवूडचा 'मकबूल' इरफान खान (Irrfan Khan) हे जग सोडून गेला. मात्र आजही त्याच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही.

आजच्या दिवशी वर्षभरापूर्वी बॉलिवूडचा 'मकबूल' इरफान खान (Irrfan Khan) हे जग सोडून गेला. मात्र आजही त्याच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही.

मुंबई, 29 एप्रिल: बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयानं ठसा उमटवणाऱ्या इरफान खानला (Irrfan Khan First Death Anniversary) जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. 29 एप्रिल 2020 रोजी न्यूरोइंडोक्राइन ट्यूमर या जीवघेण्या आजारामुळे इरफान त्याच्या लाखो चाहत्यांना सोडून निघून गेला. इरफानला जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे, मात्र तरीही तो आजही त्याच्या कलेच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांमध्ये वावरतो आहे. दरम्यान इरफानचा मुलगा बाबील खान (Babil Khan) आणि पत्नी सुतापा सिकदर (Sutapa Sikdar) यांनी इरफानच्या शेवटच्या क्षणाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. बाबीलने असं म्हटलं आहे की, त्यांना माहित होतं की ते या जगात काही दिवसांचेच पाहुणे आहेत.

इरफानचा मुलगा बाबील वेळोवेळी त्याच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आला आहे. त्याने काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वडिलांबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. 'फिल्म कंपॅनियन'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाबीलने असं म्हटलं की, 'त्या शेवटच्या दोन दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होतो. ते काहीसे बेशूद्ध होत होते. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं मी मरणार आहे, त्यावर मी म्हटलं नाही असं नाही आहे. त्यानंतर ते हसले आणि झोपून गेले.'

View this post on Instagram

A post shared by Babil (@babil.i.k)

या मुलाखतीमध्ये इरफानची पत्नी सुतापा सिकदर यांनी देखील इरफानबद्दल काही आठवणी शेअर केल्या आहेत. इरफानच्या स्वभावाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, 'तो कधीच खोटं वागत असे. जर एखाद्यावर प्रेम असेल तर तो ते व्यक्त करत असे. जोपर्यंत त्याला एखादी गोष्ट वाटत नसेल, तोपर्यंत तो ती व्यक्त करत नसे. जोपर्यंत त्याला आय I Love You खरंच बोलावं वाटत नाही तोपर्यंत तो बोलायचा नाही.' इरफानच्या आठवणीत बाबील आणि सुतापा दोघेही भावुक झाले होते.

बाबीलने सोशल मीडियावर इरफानबरोबरच्या काही आठवणी गेल्या वर्षभरात शेअर केल्या आहेत. फिल्मफेअर कडून इरफानचा मिळालेला पुरस्कार देखील बाबीलने स्विकार केला होता. तो क्षण खान कुटुंबीयांसाठी अत्यंत भावुक होता. त्यावेळी आयुष्मान खुरानाने इरफानसाठी एक कविता सादर केल्यानंतर बाबीलला देखील अश्रू अनावर झाले होते.

इरफान खान (Irrfan Khan) ला यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात (Oscar 2021) सोहळ्यात आदरांजली देण्यात आली आहे. ऑस्कर सोहळ्यात दरवर्षी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचं योगदान देणाऱ्या दिवंगत कलाकारांना आदरांजली दिली जाते. यंदाच्या वर्षी या जागतिक कलाकारांच्या यादीत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आणि वेशभूषाकार भानू अथैया (Bhanu Athaiya) यांचा देखील समावेश करण्यात आला होता.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Irrfan khan