मुंबई, 10 जून- सर्वसामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी प्रत्येकालाच आपल्या जुन्या आठ्वणींमध्ये रमायला आवडतं. बॉलिवूड (Bollywood) कलाकार बऱ्याचवेळा आपले जुने फोटो (Throwback Photo) सोशल मीडियावर शेअर करत असतात. या फोटोंद्वारे ते त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा तर देतातच पण त्यासोबतच चाहत्यांना चकितही करतात. अलीकडेच एका अभिनेत्रीने तिचा तब्बल 22 वर्षांपूर्वीचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही अभिनेत्री इतर कुणी नसून प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आहे. प्रियांका या फोटोमध्ये अवघ्या 18 वर्षांची आहे. अनेकांना तिला ओळखता येणं कठीण झालं आहे. आफ्टर अँड बिफोर प्रियांकाच्या चेहऱ्यात बराच फरक झालेला या फोटोवरुन दिसून येत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही काही वेळेसाठी प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? कारण देसी गर्ल प्रियांकाने आपल्या आठवणींमधून हा 22 वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. तुम्ही फोटोकडे बारकाईने पाहिल्यास, तुम्ही अभिनेत्रीला ओळखू शकाल. प्रियांका चोप्राने शेअर केलेला हा फोटो सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमठवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्रा लोकप्रिय आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यासंबंधी अनेक गोष्टी शेअर करत असते. आजही देसी गर्लने गर्लने असाच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर स्वतःचा 22 वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. हा पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. **(हे वाचा:** Brahmastra: डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर जखमा, ब्रह्मास्त्रमधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट Look रिलीज ) प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये देसी गर्ल तिच्या बोल्ड लुकमध्ये पाहायला मिळत आहे. प्रियांकाने बिकिनीसोबत कपाळावर टिकली लावली आहे आणि हातात काळ्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. फोटोमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे.