VIDEO : माधुरी दीक्षितच्या 'या' सुपरहिट गाण्यांसाठी नेहमी आठवणीत राहतील 'सरोज खान'

VIDEO : माधुरी दीक्षितच्या 'या' सुपरहिट गाण्यांसाठी नेहमी आठवणीत राहतील 'सरोज खान'

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित तसंच आलिया भट्ट या वेगवेगळ्या दशकातील सुपरहिट अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केले आहे.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : सरोज खान फिल्म इंडस्ट्रीमधील पहिल्या महिला नृत्य दिग्दर्शिका होत्या, ज्यांनी अनेक अभिनेत्रींना ओळख मिळवून दिली होती. 2000 पेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ करणाऱ्या सरोज खान यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. कोरिओग्राफीआधी त्या 50 च्या दशकात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायच्या.असे बोलले जाते की, नृत्य आणि चेहऱ्यावरील हावभाव यामध्ये माधुरीने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली त्यात सरोज खान यांचा मोठा वाटा आहे.

माधुरीची अनेक हिट गाणी सरोज खान यांनी कोरिओग्राफ केली आहेत. 'धक-धक'पासून 'तबाह होगए'पर्यंत अनेक गाणी सरोज खान यांच्या नृत्य दिग्दर्शनामुळे हिट झाली आहेत.

/

याव्यतिरिक्त देखील सरोज खान यांनी सुपरडुपर हिट फिल्म्स- मिस्टर इंडिया, चांदनी, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेस, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथ‌िया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जव वी मेट, एजेंट विनोद, रावडी राठोड, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका' यांमध्ये नृत्य दिग्दर्शन केले होते. त्या्ंच्या अदा अनेक अभिनेत्रींनी शिकून घेत करिअर घडवले आहे.

(हे वाचा-प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम)

सरोज खान यांनी 3 वर्षांची असताना बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. नृत्याचे कोणतेही औपचारीक शिक्षण न घेता त्यांनी बॉलिवूडमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. त्यांना लहानपणापासून नृत्याची खूप आवड होती. सरोज यांनी नृत्य दिग्दर्शन केलेला 'कलंक' हा शेवटचा सिनेमा. यामध्येही त्यांनी माधुरीबरोबर काम केले आहे. एक काळ असा होता की सरोज खान यांचे नृत्य दिग्दर्शन आणि माधुरीचे नृत्य असे समीकरण असले की ते गाणे हिटच ठरायचे. माधुरी आणि सरोज खान यांंचे नाते त्यांच्या डान्समधून झळकायचे. काही दिवसांपूर्वी माधुरीच्या वाढदिवशी देखील सरोज खान यांनी काही जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणी ताज्या केल्या होत्या.

03 जुलै रोजी कार्डियाक अरेस्टमुळे सरोज खान यांचा मृत्यू झाला. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणामुळे त्यांना वांद्रे याठिकाणच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अचानक रात्री त्यांची तब्येत बिघडली आणि शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 3, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading