जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मीनाक्षी शेषाद्रींच्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम; अभिनेत्रीने स्वतःच दिली माहिती

मीनाक्षी शेषाद्रींच्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम; अभिनेत्रीने स्वतःच दिली माहिती

मीनाक्षी शेषाद्रींच्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम; अभिनेत्रीने स्वतःच दिली माहिती

80-90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi KShishadri) या कित्येक वर्षांपासून चित्रपटसृष्टी पासून लांब आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मे : कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. कोरोनाने कित्येक कलाकारांचा सुद्धा बळी घेतला आहे. 80-90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी क्षेषाद्री (Meenakshi KShishadri) या कित्येक वर्षांपासून चित्रपटसृष्टी पासून लांब आहेत. मात्र चाहते आजही त्यांच्या अभिनयाचे वेडे आहेत. मात्र नुकताच मीनाक्षी यांच्या निधनाची अफवा (Minakshi’s death rumor) सोशल मीडियावर उठली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः फोटो शेयर करत आपण एकदम ठीक असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. नुकताच एका वाहिनीने 80-90 च्या दशकातील या सुपरहिट अभिनेत्रीवर पूर्ण एक एपिसोड दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये असा समज झाला की, त्यांचं निधनचं झालं. आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. मात्र ही गोष्ट जेव्हा मीनाक्षी शेषाद्री यांच्या कानावर पडली. त्यावेळी त्यांनाही धक्काच बसला. त्यांनी ही एक अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

जाहिरात

मीनाक्षी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये त्या योग मुद्रा मध्ये बसलेल्या दिसून येत आहेत. त्यांच्या वयाचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. मात्र त्यांचा फिटनेस भल्याभल्यांना टक्कर देत आहे. त्यांनी फोटो पोस्ट करत ‘डान्स पोज’ असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्यांनी लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यात त्या खुपचं सुंदरसुद्धा दिसत आहेत. (हे वाचा: कंगनाची (Twitter) बोलती बंद! अभिनेत्रीविरोधात पोलिसात तक्रार दाखल ) मात्र या खुलास्यावर सुद्धा अजून संशय व्यक्त केला जात आहे. कारण हा अकाऊंट ऑफीशियल नाही. त्यावर निळ्या रंगाची टिक नाही. मीनाक्षी शेषाद्री यांनी 1995 मध्ये इन्वेस्टमेंट बँकर हरिश म्हैसूर यांच्याची विवाह केला होता. लग्नानंतर त्या अमेरिकेच्या टेक्सास या शहरामध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांना 2 मुले देखील आहेत. त्यांना सुरुवाती पासूनचं डान्सची आवड होती. टेक्सासमध्ये त्या भारतीय क्लासिकल डान्ससुद्धा शिकवत होत्या. (हे वाचा: बॉलिवूडमध्ये कोरोनाचं थैमान! एकाच दिवशी दोन अभिनेत्रींनी आपल्या भावाला गमावलं   ) हिंदीसोबतचं त्यांनी तमिळ आणि तेलुगु चित्रपटांत देखील काम केलं आहे. 1983 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यांच्या सोबत सह कलाकार म्हणून जेकी श्रॉफ होते. हा चित्रपट अतिशय सुपरहिट ठरला होता.  मीनाक्षी यांनी डकैत, मेरी जंग, गंगा जमुना सरस्वती, दामिनी यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात