मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

83 Trailer Out: स्वातंत्र्यानंतर परकीय भूमीवर असा मिळाला सन्मान; '83' चा ट्रेलर पाहून प्रेक्षक म्हणाले ,'HIT' आहे

83 Trailer Out: स्वातंत्र्यानंतर परकीय भूमीवर असा मिळाला सन्मान; '83' चा ट्रेलर पाहून प्रेक्षक म्हणाले ,'HIT' आहे

 '83' चित्रपटाच्या ट्रेलरची   (83 Trailer Release)   वाट पाहत असलेली चाहत्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली. दीर्घ प्रतिक्षेनंतर आज सकाळी रणवीर सिंग   (Ranveer Singh)  आणि दीपिका पदुकोण यांच्या '83' चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 नोव्हेंबर-   '83' चित्रपटाच्या ट्रेलरची   (83 Trailer Release)   वाट पाहत असलेली चाहत्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली. दीर्घ प्रतिक्षेनंतर आज सकाळी रणवीर सिंग   (Ranveer Singh)  आणि दीपिका पदुकोण यांच्या '83' चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित, हा चित्रपट वास्तविक हिरोंच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी देशाचे स्वप्न साकार केले होते. ट्रेलर देशभक्तीने भरलेला आहे. रणवीर सिंगसोबत संपूर्ण क्रिकेट टीमचा उत्साह पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

3 मिनिट 49 सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमचेही डोके अभिमानाने उंचावेल. ट्रेलर पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, आपल्या खेळाडूंनी देशाची प्रतिष्ठा आणि गौरव वाढवण्यासाठी परदेशी भूमीवर किती मेहनत घेतली आहे. ट्रेलर पाहून चाहते चित्रपटाला हिट म्हणत आहेत. 'धोनी' नंतर हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करेल असे लोक म्हणत आहेत.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयाच्या कथेवर आधारित आहे. त्यावेळी कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. या चित्रपटात ते लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. पुन्हा एकदा रणवीरने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

पूर्ण ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला की चित्रपट धमाल करणार आहे, परंतु ट्रेलरमधील एक दृश्य लोकांना उत्तेजित करत आहे. जिथे कपिल देव बनलेला रणवीर सिंग म्हणतो की तो वेस्ट इंडिज विश्वचशक जिंकण्यासाठी आला आहे. त्यामुळे सर्वजण त्याचंही खिल्ली उडवतात. यानंतर, सततच्या पराभवावर कपिलने आपल्या पोशाखाबद्दल आणि मैदानात परिधान केल्याच्या सन्मानाबद्दल बोलतो आणि त्यांनतर संघाने जिंकून इतिहास रचला आणि सांगितले की भारताला स्वातंत्र्य मिळाले पण परदेशी भूमीवर सन्मान मिळाला.

First published:

Tags: Entertainment, Ranveer sigh