जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Janhavi Kapoor: जान्हवी-खुशी कपूरने एकाच मुलाला केलंय डेट? अभिनेत्रीने दिलं स्पष्टच उत्तर

Janhavi Kapoor: जान्हवी-खुशी कपूरने एकाच मुलाला केलंय डेट? अभिनेत्रीने दिलं स्पष्टच उत्तर

जान्हवी आणि ख़ुशी कपूर

जान्हवी आणि ख़ुशी कपूर

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चित स्टारकिड्सपैकी एक म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपूर होय.ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांची मोठी लेक जान्हवी कपूर हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑक्टोबर- बॉलिवूड मधील सर्वात जास्त चर्चित स्टारकिड्सपैकी एक म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपूर होय.ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांची मोठी लेक जान्हवी कपूर हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ एक स्टारकिड असल्यामुळे तिला सिनेमे मिळत असल्याचं मानलं जात होतं. मात्र जान्हवी कपूर हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. सोबतच जान्हवीबद्दल बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या अफवाही उडत असतात. पण बर्‍याच गोष्टींकडे जान्हवी लक्ष देत नाही. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या त्यांनासुद्धा अस्वस्थ करतात.अशीच एक अफवा होती, जिने जान्हवीला त्रस्त केलं होतं. जान्हवी कपूरने नुकतंच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर मोकळेपणाने संवाद साधला आहे. यावेळी जान्हवीला विचारण्यात आलं तुझ्याबाबत उठलेल्या सर्व अफवांमध्ये सर्वात वाईट अफवा कोणती आहे? तर यावर उत्तर देत जान्हवीने म्हटलं की, मी ऐकलं होतं की, ‘मी आणि बहीण खुशी कपूर एकाच व्यक्तीला डेट करत आहोत, हे खूप त्रासदायक होतं.’ जान्हवीने ही केवळ एक अफवा असल्याचं सांगत आपल्याला या गोष्टीमुळे प्रचंड त्रास झाल्याचं तिने सांगितलं आहे. सध्या जान्हवीची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. **(हे वाचा:** साराचा क्लासमेट,न्यासाचा मित्र आणि जान्हवीचा बॉयफ्रेंड? कोण आहे सर्वच स्टारकिड्सच मित्र असलेला Orry )

जाहिरात

पुढे बोलताना जान्हवी म्हणते की, अफवांच्या बाजारातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं कुटुंबदेखील त्यात ओढलं जातं. जान्हवी म्हणाली, ‘आमच्या दोघींबाबत अशी अफवा होती की मी अक्षत राजनला डेट करत आहे आणि त्यानंतर माझं ब्रेकअप झालं आणि मग खुशीने त्याला डेट करायला सुरुवात केली.हे आमच्यासाठी खूप त्रासदायक होतं. मी किंवा खुशी दोघींनीही त्याला डेट केलेलं नाहीय. तो आमचा बालपणीचा खूप चांगला मित्र आहे.त्यामुळे डेटिंगच्या गोष्टी या केवळ अफवा आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

सोशल मीडियावर जान्हवीच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक अफवा पसरत असतात. काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की, बोनी कपूर पैसे देऊन लेक जान्हवीला चित्रपट मिळवून देतात. जान्हवी कपूरने 2018 च्या मध्यात ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपट्टाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा चित्रपट मराठीतील गाजलेला चित्रपट ‘सैराट’चा रिमेक होता. त्यनांतर ती वेगवेगळ्य पद्धतीच्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. जान्हवी लवकरच ‘मिली’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार अहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी कौशल आणि मनोज पाहवा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘मिली’ हा मल्याळम चित्रपट ‘हेलेन’चा रिमेक आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात