Home /News /entertainment /

‘लैलाट अल बारा अह…’; बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या होळीच्या अनोख्या शुभेच्छा

‘लैलाट अल बारा अह…’; बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या होळीच्या अनोख्या शुभेच्छा

यंदाच्या वर्षी होळीवर कोरोनाचं सावट आहे. मात्र तरी देखील लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. देशवासीय नेहमीच्याच उत्साहनं पण कोरोनाच्या नियमांचं पालन करुन धुलिवंदनाचा आनंद घेताना दिसत आहेत.

  मुंबई 29 मार्च: होळी हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय सणांपैकी एक आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण रंगांची उधळण करुन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. (Holi 21 celebration party) यंदाच्या वर्षी होळीवर कोरोनाचं सावट आहे. मात्र तरी देखील लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. देशवासीय नेहमीच्याच उत्साहनं पण कोरोनाच्या नियमांचं पालन करुन धुलिवंदनाचा आनंद घेताना दिसत आहेत. (Holi 21) बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. राज कपूरपासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या घरी होळीची खास पार्टी आयोजित केली जाते. कोरोनामुळे या उत्साहावर काहीशी मर्यादा आली आहे. मात्र तरी देखील सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या. अवश्य पाहा - पाहा देवमाणूसमधील मायराचं बॉलिवूड कनेक्शन; सलमान-वरुणसोबत केलंय काम कंगना रनौतने ‘तेजस’ चित्रपटाच्या टीमबरोबर फोटो शेअर करत होळीची शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने  लिहिले की, ‘होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं ….’ या वेळी कंगना जैसलमेरमध्ये शुटिंग करत आहे. अवश्य पाहा - ‘अन् त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला’; अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्याचं कारण
  अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘हॅपी फेस्टिव्हल डे टू ऑल: लैलाट अल बारा अह… आपल्या मुस्लिम मित्रांची क्षमा करण्याची रात्री, आपल्या ख्रिश्चन मित्रांसाठी पाम रविवार, ज्यू मित्रांसाठी पासओव्हर आणि हिंदू मित्रांसाठी होळी. काय योगायोग आहे. पुढची शंभर वर्षे हे सण असेच एकत्र साजरे करू.’ होळी, धूलिवंदनावर कोरोनाचं सावट यंदा होळी धूलिवंदनावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर पालिके ने होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे. तसेच आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिके च्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके  तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Ananya panday, Holi 2021, Kangana ranaut, Marathi entertainment

  पुढील बातम्या