मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बसपन का प्यार' गाण्याने उडवली अनुष्का शर्माची झोप; पोस्ट शेयर करत म्हणाली...

'बसपन का प्यार' गाण्याने उडवली अनुष्का शर्माची झोप; पोस्ट शेयर करत म्हणाली...

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडीग असलेल्या एका चिमुकल्याच्या ‘बसपन का प्यार मेरा’(Basapan Ka Pyar) या गाण्याने माझी झोप चोरली आहे.

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडीग असलेल्या एका चिमुकल्याच्या ‘बसपन का प्यार मेरा’(Basapan Ka Pyar) या गाण्याने माझी झोप चोरली आहे.

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडीग असलेल्या एका चिमुकल्याच्या ‘बसपन का प्यार मेरा’(Basapan Ka Pyar) या गाण्याने माझी झोप चोरली आहे.

मुंबई, 29 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma) शर्माची झोप उडाली आहे. अभिनेत्रीने स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत याबद्दल सांगितल आहे. कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा झोप येणं शक्य नाहीय. असं काय घडलं आहे, की या बॉलिवूड अभिनेत्रीची अक्षरशः झोप उडाली आहे. मात्र ही झोप एका चांगल्या अर्थाने गेली आहे. अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे की सध्या सोशल मीडियावर ट्रेंडीग असलेल्या एका चिमुकल्याच्या ‘बसपन का प्यार मेरा’(Basapan Ka Pyar) या गाण्याने माझी झोप चोरली आहे.

नुकताच अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हायरल होतं असलेला चिमुकला सहदेव दिरदोच्या संबंधित एक मिम्स शेयर केला आहे. यामध्ये एक माणूस रात्री झोपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याला झोपचं येत नसते. कारण त्याच्या डोक्यातून छोट्या सहदेवचं ‘बसपन का प्यार’ हे गाणं बाहेर पडत असतं. अनुष्काने आपल्या या मजेदार मिम्ससोबत हसण्याचे काही इमोजीदेखील शेयर केले आहेत. अनुष्का शर्माने ही पोस्ट बास्केटबॉल खेळाडू आणि क्रिकेटर ईशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंगच्या पेजवरून ही पोस्ट रीपोस्ट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by PATNA in HD (@patnahd)

या चिमुकल्या सहदेवचं ;बसपन का प्यार’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर खुपचं ट्रेंडीग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात आज हेचं गाणं आहे. इतकचं नव्हे तर अनेक कलाकार स्वतःला या गाण्यावर रील करण्यापासून थांबवू शकत नाहीयेत. अनेक कलाकार या गानायवर मजेशीर रील बनवून सोशल मीडियावर शेयर करत आहेत. सहदेवचा हा निरागस व्हिडीओ सध्या खुपचं व्हायरल होतं आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेसुद्धा त्याची दखल घेतली आहे.

(हे वाचा: तब्बल 21 वर्षे लहान मान्यता सोबत संजय दत्तचे जुळले सूत; असं झालं तिसरं लग्न)

सहदेवने हे गाणं 2 वर्षांपूर्वी म्हटलं आहे. जेव्हा परिस्थिती अगदी सामान्य होती. आणि तो शाळेत जात होता. तेव्हा तो पाचवीच्या वर्गात होता. आणि आपल्या शिक्षकाच्या सांगण्यावरून त्याने वर्गात हे गाणं म्हटलं होतं. हे गाणं सध्या इतकं व्हायरल होतं आहे की, गायक बादशाहनेसुद्धा याची दखल घेत सहदेवला चंदिगढ येण्याचं आमंत्रण दिलं आहे. इतकचं नव्हे तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलनेसुद्धा या चिमुकल्याची भेट घेतली आहे.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Bollywood actress