मुंबई, 24 मे- बॉलिवूड-हॉलिवूड (Bollywood & Hollywood) अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिची मॅनेजर अंजुला आचार्यचा (Anjula Acharay Birthday) वाढदिवस लॉस एंजेलिसमध्ये अगदी देसी स्टाईलमध्ये साजरा केला. प्रियांकाने स्वतः आपल्या घरी ही पार्टी आयोजित करून तिच्या मॅनेजरला सरप्राईज केलं आहे. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये प्रियांका आपली मॅनेजर आणि पती निक जोनससोबत ढोलाच्या तालावर भांगडा करताना दिसत आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना खास वागणूक देत असते. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या मॅनेजरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक फोटोही शेअर केला आहे. यासोबतच प्रियांका-निकच्या फॅन क्लब 'Jerry x Mimi' इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंजुलाच्या बर्थडे बॅशचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रियांकाच्या सरप्राईजने आनंदी झालेल्या तिच्या मॅनेजरने एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि या सगळ्याबद्दल तिचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
वाढदिवसाच्या पार्टीत प्रियंका हिरव्या रंगाच्या जंपसूटमध्ये दिसत आहे. तर तिची मॅनेजर काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. ऑलिव्ह ग्रीन जॅकेट आणि राखाडी पँटमध्ये निक जोनस फारच हॅन्ड्सम दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या मॅनेजरला सरप्राईज देत स्वतः केक आणताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला एक ढोल वाजताना ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका बर्थडे गर्ल आणि निकसोबत प्रचंड उत्साहात भांगडा करताना दिसत आहे.
View this post on Instagram
आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियांका आपली मॅनेजर आणि पती निक जोनससोबत डिनर करताना दिसत आहे. याशिवाय ती तिच्या गर्ल गँगसोबत फोटो क्लिक करताना आणि धम्माल करतानासुद्धा दिसत आहे. प्रियांकाच्या मॅनेजरने पार्टीचे काही व्हिडिओ आणि फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करून देसी गर्लचे आभारही मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Nick jonas, Priyanka chopra