मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Taapasee Pannu ला बनायचं आहे 'मॅडम फायनान्स मिनिस्टर', काय आहे अभिनेत्रीची 'मन की बात'?

Taapasee Pannu ला बनायचं आहे 'मॅडम फायनान्स मिनिस्टर', काय आहे अभिनेत्रीची 'मन की बात'?

Taapsee Pannu Latest News: अभिनेत्री तापसी पन्नू मोठ्या पडद्यावर कधी क्रिकेटर बनते, कधी अॅथलीट तर कधी शूटर. या सर्व भूमिका तिने लिलया पार पाडल्या आहेत. मात्र आता तापसीने एक खास भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई, 08 एप्रिल: बॉलिवूडमध्ये सध्या एखाद्या व्यक्तीच्या बायोपिकची (Bollywood Biopic movies) सर्वाधिक जाते. विविध क्षेत्रातील व्यक्तींवर बायोपिक बनवले जातात. अभिनेते, खेळाडू, राजकारणी व्यक्ती इ. वर बायोपिक बनवले जातात. अशाप्रकारे बायोपिक आधारित सिनेमांविषयी बोलायचं झालं तर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu Latest Movies) हिचं नाव आघाडीने घेता येईल. तापसी मोठ्या पडद्यावर कधी क्रिकेटर बनते, कधी अॅथलीट तर कधी शूटर. या सर्व भूमिका तिने लिलया पार पाडल्या आहेत. मात्र आता तापसीने एक खास भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman Biopic) यांची भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

निर्मला सीतारामन यांच्या बायोपिकबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र तापसीने अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आता एखादा दिग्दर्शक या विषयावर विचार करू शकतो. तापसी पन्नूने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान असे म्हटले की, अशाप्रकारच्या एखाद्या प्रोजेक्टचा भाग बनणं अभिमानास्पद असेल, मात्र निश्चितच याकरता मॅडमची परवानगी असणं आवश्यक आहे.

हे वाचा-हा साउथ सुपरस्टार करणार बॉलिवूडमध्ये एंट्री? म्हणाला- मला हिंदी चित्रपट करण्याची आवश्यकता...

हा पुरस्कार तापसीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याच हस्ते मिळाला आहे. CNBC TV18 इंडिया प्रस्तुत इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड सोहळ्यात तापसीला 'एंटरटेनमेंट ब्रँड ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दरम्यान या दरम्यान तिला इंडस्ट्रीमधील अभिनेत्री आणि अभिनेते यांना मिळणाऱ्या मानधनातील तफावत याविषयी विचारले असता तिने उत्तर दिले की, दिल्ली अजून खूप दूर आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसी पन्नूच्या बायोपिक चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 'रश्मी रॉकेट' ही अॅथलीटची कथा होती तर 'सांड की आँख'मध्ये तिने नेमबाज 'तोमर दादी' यांची भूमिका केली होती. ती आगामी बायोपिक 'शाबाश मिथू'मध्ये (Shabash Mithu Taapsee Pannu New Movie) ती क्रिकेटर मिताली राजची भूमिका साकारत आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Nirmala Sitharaman, Taapsee Pannu