मुंबई, 07 नोव्हेंबर: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. आता देखील काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. भारतात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. हळूहळू देशातील एक एक इंडस्ट्री पूर्ववत करण्याच्या विचारात सरकार आहे. बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीवरही कोव्हिडचा (Covid-19) मोठा परिणाम झाला. दीर्घकाळासाठी शूटिंग बंद असल्याने कलाकार मंडळी देखील घरीच होती. दरम्यान कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) देखील अमेरिकेत गेली होती. देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे सनी लिओनी देखील मुंबईत परतली आहे. तिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. अमेरिकेत सहा महिने राहिल्यानंतर ती मुंबईत पोहोचली आहे. इन्स्टाग्रामवर फ्लाइटमधील एक फोटो शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे. यावेळी आवश्यक नियमांचे पालन करनाता ती दिसली.
सनी लिओनी 10 मे रोजी तिचा पती डॅनिअर वेबर आणि तीन मुलं निशा, नूह आणि अशर बरोबर अमेरिकेत गेली होती. कोरोनाच्या संकटकाळात कुंटुंबाबरोबर असणे आवश्यक होते असल्याने, ती अमेरिकेत गेली होती. जेव्हा तिने अमेरिका गाठली त्यावेळी पहिल्याच फ्लाइटनं मुंबईला येण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया सनीने दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली होती की, ‘सध्याच्या परिस्थितीत माझं आणि डॅनिअलचं त्याची आई आणि कुटुंबासोबत असणं खूप गरजेचं होतं आणि मलाही माझ्या कुटुंबासोबत राहायचं होतं.’ दरम्यान आता पुन्हा एकदा ती कर्मभूमी असणाऱ्या मुंबईत दाखल झाली आहे. (हे वाचा- करण-अर्जुन आएंगे! पुन्हा पाहायला मिळणार सलमान-शाहरुख जोडीची केमिस्ट्री )
लॉकडाऊन काळातही सनी सोशल मीडियावर सक्रीय होती. तिने तिच्या आयुष्यातील विविध अपडेट्स चाहत्यांना दिले होते. त्याचप्रमाणे कुटुंबाबरोबरचे काही फनी व्हिडीओ आणि फोटो देखील यावेळी सनीने शेअर केले होते.