मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raj Kundra Arrested: पती राज कुंद्राच्या अटकेमुळे, शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ

Raj Kundra Arrested: पती राज कुंद्राच्या अटकेमुळे, शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. ती सध्या 2 बिग बजेट चित्रपटांत झळकणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. ती सध्या 2 बिग बजेट चित्रपटांत झळकणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. ती सध्या 2 बिग बजेट चित्रपटांत झळकणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 20 जुलै-  बॉलिवूड (Bollywood)  अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला अश्लील चित्रफित रेकॉर्ड करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वृत्तसंस्था ANI शी संवाद साधत मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, यामध्ये तो मुख्य सूत्रधार असल्याचं कळत आहे. याबाबतीत आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. यानंतरचं ट्वीटरवर लोक शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला मोठ्या प्रमाणात ट्रोल करू लागले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. ती सध्या 2 बिग बजेट चित्रपटांत झळकणार आहे. लवकरच ती बहुप्रतीक्षित निकम्मा आणि हंगामा 2 या चित्रपटांत दिसणार आहे. शिल्पाचा पती राज कुन्द्राच्या अटकेच्या थेट परिणाम तिच्या चित्रपटावर पडू शकतो. त्यामुळे तिच्या अडचणींत वाढ झाल्याचं म्हटलं जातं आहे. 2003 मध्ये आलेल्या हंगामा या विनोदी चित्रपटाचा ‘हंगामा 2’ हा सिक्वल आहे. येत्या 23 जुलैला हा चित्रपटा डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

(हे वाचा:BREAKING : राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी केली अटक  )

तर दुसरीकडे शब्बीर खानच्या ‘निक्कमा’ चित्रपटाची रिलीज डेट अजूनही समोर आलेली नाहीय. अभिनेत्री शिल्पा शेट्टी शेवट, 2007 मध्ये ‘अपने’ या चित्रपटात दिसून आली होती. त्यानंतर तिने उद्योजक राज कुंद्रासोबत लग्न केलं होतं. आणि नंतर ती आपल्या संसारात रमली होती. आणि चित्रपटांपासून दूर होती. मात्र आत्ता तब्बल 14 वर्षांनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हे वाचा: भुजः द प्राइड ऑफ इंडिया'च्या चित्रीकरणादरम्यान नोरा फतेही जखमी )

तसेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेली 5 वर्षे छोट्या पडद्यावरील डान्स शो ‘सुपर डान्सर’ मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. मात्र सध्या पती राज कुंद्राच्या अटकेमुळे ती या कार्यक्रमाचा भाग असणार की नाही हे येणारी वेळचं सांगेल. मात्र पतीच्या अटकेचा परिणाम तिच्या करीयरवर पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण राज कुंद्रा ज्या प्रकरणामध्ये अटक झाला आहे, त्यावरून लोक सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात निंदा करत आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Police arrest, Shilpa shetty, Social media viral