• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • सविता बजाज यांच्या स्थितीवर सचिन पिळगांवकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, लोक सेविंग....

सविता बजाज यांच्या स्थितीवर सचिन पिळगांवकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, लोक सेविंग....

सविता बजाज यांनी अभिनेता सचिन पिळगांवकरांसोबत(Sachin Pilgoankar) ‘नदीया के पार’ चित्रपटात काम केलं होतं.

  • Share this:
    मुंबई, 18 जुलै- नुकताच अभिनेत्री शगुफ्ता अली नंतर ‘नदिया के पार’ (Nadiyan Ke Paar) फेम ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज यांनीसुद्धा (Savita Bajaj) आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचा खुलासा केला होता. कोरोना महामारी आणि त्यानंतर आलेलं आजारपण यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी म्हटलं होतं, की त्यांच्याजवळ असलेली सर्व मिळकत आत्ता संपली आहे, इथून पुढे उदरनिर्वाह करनं कठीण आहे. सविता बजाज यांनी अभिनेता सचिन पिळगांवकरांसोबत (Sachin Pilgoankar) ‘नदीया के पार’ चित्रपटात काम केलं होतं. अशातचं आत्ता अभिनेता सचिन यांनी सविता यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी इंडिया टाइम्ससोबत संवाद साधला आहे, यादरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘नुकताच मी वृत्तपत्रामध्ये सविता यांच्याबद्दल वाचलं. मला वाटतं की एसोसिएशनच्या लोकांनी पुढ येऊन कलाकार आणि टेक्नीशियन्सची मदत करावी. जर तुम्ही IPMPPA आणि CINTAA कडे मदत मागितला तर ते नक्कीचं तुमची मदत करतील. यासाठी तुम्ही त्यांचे सदस्यचं असणं आवश्यक नाही’. (हे वाचा:सोनूला मिळतोय चांगल्या कामांचा मोबदला; अभिनेत्यावर होतोय चित्रपटांचा वर्षाव) जेव्हा सचिन यांना सांगण्यात आलं, की CINTAA ने सविता यांना मदत केली आहे, तेव्हा ते पुढे म्हणाले, ‘हे पाहा दोन गोष्टी असतात. पहिली ही की CINTAA जवळ कोणतीही गोष्ट आलेली नाहीय. आणि दुसरी म्हणजे लोक सेविंग का नाही करत? दुसऱ्यांकडे बोट करणं सोपं असतं. मात्र लोक हे विसरतात त्यावेळी उरलेली चार बोटे आपल्याकडे असतात. मी कोणत्याही कलाकारावर आरोप करत नाहीय. मात्र आयुष्यात कोणतीही वाईट वेळ सांगून येत नाही. त्यामुळे सेविंग ठेवायला हवी’. (हे वाचा: करीनाने शेयर केला बालपणीचा क्युट PHOTO; आई आणि बहिणीसोबत देतेय पोझ) काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सविता बजाज यांनी आपल्यावर आलेल्या आर्थिक संकटाचा खुलासा केला होता. शिवाय असंही म्हटलं होतं की, ‘त्यांनी 25 वर्षांपूर्वी आपल्या शहरात म्हणजेच दिल्लीत परत जायचं ठरवलं होतं. मात्र  त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी ठेवून घेण्यास नकार दिला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी खूप पैसा मिळवला, खूप लोकांना मदत केली आहे. आत्ता स्वतः चं स्वतः चा सांभाळ कर म्हणत त्यांची साथ सोडून दिली होती. मात्र त्या म्हणाल्या की आत्ता वेळ अशी आहे की मलाच मदतीची गरज आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: