Home /News /entertainment /

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीलासुद्धा जडलाय जेडासारखा दुर्मिळ आजार,व्यक्त केली खंत

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीलासुद्धा जडलाय जेडासारखा दुर्मिळ आजार,व्यक्त केली खंत

ऑस्कर 2022 (Oscars 2022) दरम्यान हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने (Will Smith) ख्रिस रॉकला (Chris Rock) कानशिलात लगावल्यानंतर एकच खळबळ माजली होती. सोशल मीडियावर सतत या गोष्टीची चर्चा होत आहे. दरम्यान लोकांना सोशल मीडियावर अॅलोपेसिया (Alopecia) नावाच्या आजाराबद्दल जाणून घ्यायचं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 मार्च-   ऑस्कर 2022   (Oscars 2022)  दरम्यान हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने (Will Smith) ख्रिस रॉकला   (Chris Rock)  कानशिलात लगावल्यानंतर एकच खळबळ माजली होती. सोशल मीडियावर सतत या गोष्टीची चर्चा होत आहे. दरम्यान लोकांना सोशल मीडियावर अॅलोपेसिया   (Alopecia)   नावाच्या आजाराबद्दल जाणून घ्यायचं आहे. ज्यासाठी ख्रिस रॉकला ऑस्कर विजेत्याने कानाखाली मारलं होतं. हा एक असा आजार आहे ज्याबद्दल सर्वांनाच माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का की, बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीलाही   (Sameera Reddy)  जेडा पिंकेट स्मिथला (Jada Pinkett Smith)  असलेल्या या आजाराने ग्रासले आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या आजारपणाबद्दल खुलासा केला आहे. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथच्या या घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने सांगितलं की, तिलाही अॅलोपेसियाचा त्रास कसा सहन करावा लागला आहे. समीराने तिचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत सोबतच तिने या आजाराबाबत मनमोकळेपणाने बोललं आहे. आणि चाहत्यांना हा कोणता आजार आहे याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. समीरा रेड्डी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही पोस्ट करत असते. नुकतंच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे. 'नुकत्याच झालेल्या ऑस्कर वादामुळे मला माझ्या केसगळतीच्या लढाईबद्दल सांगण्यास भाग पाडले. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक आव्हाने आहेत आणि आपण ती लढत आहोत. आपण फक्त त्यातून सकारात्मक गोष्टी उचलणं आवश्यक आहे. Alopecia Areata म्हणजे काय? हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे'. “जेव्हा तुम्हाला अॅलोपेसिया होतो, तेव्हा ते तुमच्या केसांना नुकसान पोहोचवते. केस झपाट्याने गळू लागतात आणि टक्कल पडू लागते. माझ्या बाबतीतही असंच घडलं होतं. महिन्याभरात माझ्या केसांमध्ये दोन ठिकाणी अंतर पडलं होतं. या रोगाचा सामना करणं खूप कठीण आहे. अॅलोपेसिया अरेटा लोकांना आजारी बनवत नाही किंवा तो संसर्गजन्य देखील नाही, परंतु भावनिकदृष्ट्या ते एखाद्या व्यक्तीला कमकुवत बनवते'. समीराने तिच्या पोस्टमध्ये अॅलोपेसियाच्या विविध प्रकारांबद्दलही सांगितलं आहे. स्वतः च्या उपचाराबाबत बोलताना ती म्हणाली, 'डोक्याच्या मुळाशी कॉर्टिकोस्टेरॉईड्सचे इंजेक्शन घेतल्याने माझे केस परत आले. पण डॉक्टरांनी तिला असंही सांगितलं आहे की, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हा आजार पुन्हा उदभवू शकतो. एका माणसाने आयुष्यात येण्याचे वेगळं किंवा विशेष कारण नसतं. हे फक्त तुमच्या बाबतीत घडतं.'' शेवटी समीराने जगभरातील लोकांनी एकमेकांच्या समस्यांबाबत संवेदनशील व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Hollywood, Oscar award

    पुढील बातम्या