मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कशी होती अभिनेत्री रिचा चड्ढाची Weight Loss Journey? 3 महिन्यात घटवले 15 किलो वजन

कशी होती अभिनेत्री रिचा चड्ढाची Weight Loss Journey? 3 महिन्यात घटवले 15 किलो वजन

आपल्या दमदार स्टाइलसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha Instagram) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्रीच्या ट्रान्सफॉर्मेशनने (Richa Chadha Transformation) सर्वांना आश्चर्यचकित केले होते. रिचाने तीन महिन्यात 15 किलो वजन घटवले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 एप्रिल: आपल्या दमदार स्टाइलसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha Instagram) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्रीच्या ट्रान्सफॉर्मेशनने (Richa Chadha Transformation) सर्वांना आश्चर्यचकित केले होते. रिचाने तीन महिन्यांत 15 किलो वजन कमी केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या नवीन फोटोंमध्ये तिचा लुक खूपच प्रभावी आणि ग्लॅमरस दिसत आहे. अलीकडेच रिचाने तिच्या वजन कमी (Richa Chadha Weight Loss Journey) करण्याच्या प्रवासाबद्दलही सांगितले.

रिचा तिच्या वेट लॉस जर्नीबाबत म्हणाली की, 'एकंदरीत मला निरोगी राहायचे होते. मला चांगली झोप हवी होती, माझा वेग आणि व्यायामात सुधारणा करायची होती.' रिचा अतिव्यायाम करण्याच्या सवयीचा बळी असल्याचे सांगताना म्हणाली की, 'मला हे समजले आहे की जास्त व्यायाम केल्याने शरीरावर वाइट परिणाम होतो. जास्त व्यायाम केल्याने तुमच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच विश्रांती घेणे देखील खूप महत्वाचे आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.' हिंदुस्तान टाइम्सने याविषयी वृत्त दिले आहे.

हे वाचा-Mirzapur च्या साध्यासरळ स्विटीचा बॉसी लुक, ग्लॅमरस अंदाजात दिसली अभिनेत्री

रिचा चड्ढा पुढे म्हणाली की, 'ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या हाताळण्यासाठी आपल्या आरोग्याच्या काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.' अभिनेत्री म्हणाली की, 'यावेळी माझं वजन कमी करण्याचा अर्थ असा नाही की, मी माझ्या आधीच्या विधानांच्या विरोधात वागते आहे. परंतु मी जे एकदा बोलले होते त्याचे समर्थन करण्यासाठी माझे वजन 15-20 किलो वाढवून ठेवले तर ते चुकीचे ठरेल.'

'लोकांना आता स्वतःचा प्रवास ठरवायचा आहे'

यासोबतच रिचाने असेही म्हटले की, 'मला आवडत आहे की लोक आता त्यांच्या आरोग्याबद्दल आणि शरीराच्या सकारात्मकतेबद्दल बोलत आहेत. त्या इन्फ्लुएन्सर्सना सलाम जे आज बॉडी इमेजवर खुलेपणाने आपले मत व्यक्त करत आहेत. मला असे वाटते की आजच्या तरुणाईकडे या विषयांवर बोलण्यासाठी अधिक चांगल्या व्यक्ती आहेत. योग्य ठिकाणी पोहोचेपर्यंत आता लोकांना आता स्वतःचा प्रवास ठरवायचा आहे.'

First published:

Tags: Bollywood actress, Richa chadda