Home /News /entertainment /

‘ऑस्कर' स्विकारताना होती ही चिंता’; ए. आर.रेहमान यांनी सांगितला किस्सा

‘ऑस्कर' स्विकारताना होती ही चिंता’; ए. आर.रेहमान यांनी सांगितला किस्सा

संगीतातला देव समजलं जाणाऱ्या रहमान यांनी नुकताच या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आणि या दरम्यान त्यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. महत्वाचं म्हणजे त्यांनी यावेळी ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यादरम्यानची एक महत्वाची आठवण सुद्धा सांगितली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11एप्रिल: ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12)सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतं. सध्या हा कार्यक्रम चर्चेत आला आहे तो प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान (A.R.Rahman)यांच्यामुळे. संगीतातला देव समजलं जाणाऱ्या रहमान यांनी नुकताच या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आणि या दरम्यान त्यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. महत्वाचं म्हणजे त्यांनी यावेळी ‘ऑस्कर’ पुरस्कार(Oscar Award ) सोहळ्यादरम्यानची एक महत्वाची आठवण सुद्धा सांगितली आहे. पाहा त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे. शनिवारी म्हणजेच 10 एप्रिलच्या ‘इंडियन आयडॉल 12’ च्या भागात ए.आर.रहमान यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येक स्पर्धकांनी त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांनी त्यांना अभिवादन केलं. रेहमान यांनासुद्धा स्पर्धकांची गाणी खुपचं आवडली. कार्यक्रमाचे परीक्षक तसेच सर्व स्पर्धक रहमान यांच्या उपस्थितीने खुपचं भारावले होते. याच दरम्यान रेहमान यांनी आपले विविध अनुभवसुद्धा चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
    कार्यक्रमाचे परीक्षक विशाल ददलानी यांनी रहमान यांना सांगितलं, की तुम्ही असं काहीतरी या स्पर्धकांना सांगा ज्यामुळे यशातसुद्धा हे लोक भरकटणार नाहीत. जेणेकरून यशात सुद्धा हे तितकेच नम्र राहतील. यावर रहमान यांनी आपल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यानचा एक किस्सा सांगितला. यावेळी बोलताना रहमान यांनी म्हटलं आहे. ‘ज्यावेळी ऑस्करची घोषणा होणार होती. तेव्हा मला हा विचार नव्हता, की हा पुरस्कार मला मिळेल किंवा नाही. तर मला ही चिंता होती. जर हा पुरस्कार मला मिळाला तर मी कोणत्या सुरामध्ये स्टेजवर जाणार. त्याठिकाणी जाऊन मी कसं गाणार. माझं काही चुकलं तर, स्टेजवर जाऊन मी जर चुकीच्या सुरात गाणं म्हटलं तर. यावेळी मला जरी पुरस्कार मिळाला आणि माझं गाणं मात्र खराब झालं तरी to माझासाठी खूपचं अपमानास्पद असणार आहे. या पुरस्कारासोबत मी अन्याय केल्यासारख होणार’. असे कितीतरी विचार माझा मनात चालू होते. (हे वाचा:दया बेननं का सोडलं तारक मेहता का उल्टा चष्मा?; अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण  ) ए.आर.रहमान यांना 2009 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ गाण्यासाठी हा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हे गाणं अजूनही खुपचं प्रसिद्ध गाणं समजलं जातं. ए.आर.रहमान यांनी तमिळ आणि हिंदी चित्रपटांत संगीत दिलं आहे. ते मूळचे चेन्नई तामिळनाडू येथील आहेत. त्यांचं खरं नाव ‘अरुणाचलम शेखर दिलीप कुमार मुदलियार’ असं होतं. मात्र त्यांनी धर्मपरिवर्तन केल्यानंतर आपलं नाव अल्लारखा रहमान असं नाव ठेवलं होतं. याच नावाला ए.आर. रहमान असं संक्षिप्त नाव आहे. सन 2000 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे. ए.आर. रहमान यांच्या आगमनाने ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर खुपचं उत्साही वातावरण बघायला मिळालं. स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गाण्यांची मेजवानी दिली. तसेच एका स्पर्धकाच्या पालकाच्या विनंतीवरून ये आर रहमान यांनी ताल या चित्रपटातील गाण्याच्या काही ओळीसुद्धा सादर केल्या.
    Published by:Aiman Desai
    First published:

    पुढील बातम्या