मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रियांकाला KISS करत पती निकने दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा; शेअर केला रोमँटिक PHOTO

प्रियांकाला KISS करत पती निकने दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा; शेअर केला रोमँटिक PHOTO

 बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री प्रियांका चोप्रा   (Priyanka Chopra)  सध्या हॉलिवूडमध्ये   (Hollywood)  प्रचंड ऍक्टिव्ह आहे. ती सतत हॉलिवूडमध्ये नवनवीन प्रोजेक्टस करत आहे.त्यामुळे ती फारच व्यस्त असते. परंतु मोकळ्या वेळेत ती आपल्या पतीसोबत वेळ घालवताना दिसून येते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 26 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री प्रियांका चोप्रा   (Priyanka Chopra)  सध्या हॉलिवूडमध्ये   (Hollywood)  प्रचंड ऍक्टिव्ह आहे. ती सतत हॉलिवूडमध्ये नवनवीन प्रोजेक्टस करत आहे.त्यामुळे ती फारच व्यस्त असते. परंतु मोकळ्या वेळेत ती आपल्या पतीसोबत वेळ घालवताना दिसून येते.त्यांची जोडी लोकांना फारच आवडते. नुकताच प्रियांका चोप्राचा पती निक जोनसने   (Nick Jonas)   प्रियांकासोबतच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघेही रोमँटिक पद्धतीने ख्रिसमस सेलिब्रेशन  (Christmas Celebration)  करताना दिसून येत आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि हॉलिवूड अभिनेता निक जोनसने काही वेळेपूर्वी आपल्या इस्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या ख्रिसमस सेलिब्रशनचा आहे. या फोटोमध्ये प्रियांका आणि निक रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहेत. फोटोमध्ये प्रियांका आपल्या डॉगीला घेऊन निकच्या गुडघ्यावर बसलेली दिसत आहे. तर निक तिला प्रेमाने गालावर किस करताना दिसून येत आहे. आजूबाजूची जागा ख्रिसमससाठी सुंदर अशी सजवण्यात आली आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात भेटवस्तूसुद्धा ठेवण्यात आल्या आहेत. हा फोटो शेअर करत निक जोनसने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका आणि निक दोघेही आपापल्या कामात फारच व्यस्त असतात. परंतु मिळेल त्या वेळी एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी ते कधीच सोडत नाहीत. सध्या प्रियांका आपल्या 'मॅट्रिक्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. तर निक आपल्या कामात व्यस्त होता. आता मोकळा वेळ मिळताच दोघांनी एकत्र येत ख्रिसमसचं रोमँटिक सेलिब्रशन केलं आहे. प्रियांका आणि निकने आपल्या न्यूयॉर्कच्या घरात हे खास सेलिब्रशन केलं आहे. निकने शेअर केलेला हा फोटो त्यांच्या चाहत्यांना फारच पसंत पडत आहे. या फोटोवर चाहते भरभरून लाईक्स कमेंट्स देत आहेत. तसेच त्यांनाही ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(हे वाचा:कपूर फॅमिलीचं जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन! फोटोमधून आलिया-रणबीर गायब )

प्रियांका आणि निकने राजस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने तर नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली होती.या दोघांमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. मात्र तरीसुद्धा ते एकमेकांसोबत फारच खुश आहेत. ते सतत सोशल मीडियावरून आपलं प्रेम व्यक्त करत असतात. सतत त्यांचे रोमँटिक फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.निक आणि प्रियांका दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. तसेच निकचे वडील केविन जोनस यांनीही ख्रिसमसच्या पार्श्ववभूमीवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो निक जोनस आणि त्याच्या भावांचा आहे. हा फोटो त्यांच्या बालपणीचा आहे. हा फोटोसुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Entertainment, Nick jonas, Priyanka chopra