Home /News /entertainment /

प्रियांका चोप्राच्या फॅशनची उडवली खिल्ली, मिम्स पाहून प्रियांकाही नाही रोखू शकली हसू

प्रियांका चोप्राच्या फॅशनची उडवली खिल्ली, मिम्स पाहून प्रियांकाही नाही रोखू शकली हसू

    नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या फॅशनसाठी (Fashion) आणि अभिनयासाठी ओळखली जाते. पण कधी कधी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात ही फॅशन ट्रोलही होते. यापूर्वीही तिला विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे (Bad Dressing sense) अनेकदा ट्रोल केलं आहे. असं असलं तरी ती तिच्या अशा चित्र विचित्र ड्रेसचा आनंद घेताना दिसते. अलीकडेच तिने एक खास ड्रेस घातला होता. ज्यामुळे तिच्या ड्रेसिंग सेन्सची अनेकांनी खिल्ली उडवत विनोद आणि मीम्स (Jokes and meme) बनवले आहेत. तिच्यावर बनलेले हे विनोद आणि मिम्स इतके मजेदार आहेत, की स्वतः प्रियांकासुद्धा हसू रोखू शकली नाही. प्रियांका चोप्राचा हा ड्रेस इतका मजेदार आहे की, तो पाहिल्यानंतर लोकांचं हसूच थांबव नाहीये. विशेष म्हणजे प्रियांकाने स्वतः हे मिम्स आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. तसंच यावेळी तिने मिम्स बनवणाऱ्यांना धन्यवादही दिले आहेत. प्रियांकाने मिम्स शेअर करत, 'खूप मजेशीर, माझा दिवस चांगला घालवल्याबद्दल धन्यवाद.' असं म्हणत ट्वीट केलं आहे. तिचं हे ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. तर, नेटकरीही कमेंट करून प्रियांकाच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवताना दिसत आहेत. अलीकडेच प्रियांकाचं 'अनफिनिश्ड' नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. तिने तिच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी या पुस्तकात लिहिल्या आहेत. एका सामान्य घरात जन्म घेणाऱ्या प्रियांकाचा हॉलीवूडमध्ये जाण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास या पुस्तकात लिहिला आहे. तिने आपल्या पुस्तकात आपल्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्सेही सांगितले आहेत. (वाचा-सारा अली खान आणि विजय देवरकोंडा बॉलिवूडमधलं नवं जोडपं? पुन्हा दिसले एकत्र) याव्यतिरिक्त प्रियांका अलीकडेच नेटफ्लिक्सच्या एका 'वी कॅन बी हिरोज' आणि 'द व्हाईट टायगर' या चित्रपटामध्ये दिसली आहे. सध्या ती अ‍ॅमेझॉन प्राईमसाठीच्या 'सिटडेल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bad dressing sense, Bollywood actress, Entertainment, Troll, Twitter

    पुढील बातम्या