मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लहानपणी वाटायचं 'सावळी त्वचा वाईट', आता Fairness Cream च्या जाहिराती केल्याचं प्रियांकाला आहे दुःख

लहानपणी वाटायचं 'सावळी त्वचा वाईट', आता Fairness Cream च्या जाहिराती केल्याचं प्रियांकाला आहे दुःख

प्रियांकाने (Priyanka Chopra) अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत फेअरनेस क्रिमच्या जाहिराती (Fairness Cream Advertise) केल्याचं खूप दुःख असल्याचं मत (Statement) व्यक्त केलं आहे.

प्रियांकाने (Priyanka Chopra) अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत फेअरनेस क्रिमच्या जाहिराती (Fairness Cream Advertise) केल्याचं खूप दुःख असल्याचं मत (Statement) व्यक्त केलं आहे.

प्रियांकाने (Priyanka Chopra) अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत फेअरनेस क्रिमच्या जाहिराती (Fairness Cream Advertise) केल्याचं खूप दुःख असल्याचं मत (Statement) व्यक्त केलं आहे.

मुंबई, 26 जानेवारी: अगदी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रियांका चोप्रा (Priyanka chopra ) करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य करत आहे. प्रियांका चोप्रा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफबाबत नेहमी चर्चेत असते. ती आपल्या खाजगी आयुष्याबाबत मोकळेपणाने मतं मांडते. मग मुद्दा निक जोनास (Nick Jonas) सोबतच्या प्रेम कहाणीचा असो वा तिच्या कारकिर्दित येणाऱ्या विविध समस्यांचा असो. अशा मुद्यांवर प्रियांका नेहमी ठळकपणे मुद्दे मांडत असते. तिच्या अशा सडेतोड बोलण्यामुळे तिला अनेकवेळा विरोधकांचा सामनाही करावा लागतो.

प्रियांकाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत फेअरनेस क्रीमच्या जाहिराती (Fairness Cream Advertise) केल्याचं खूप दुःख असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भारतात फेअरनेस क्रीमची जाहिरात केल्यामुळे तिला एकेकाळी खूप लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्यापासून फेअरनेस क्रिमच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक भारतीय कलाकार म्हणून फेअरनेस क्रीमची जाहिरात करणं खुप सामान्य गोष्ट आहे. भारतातल्या अनेक अभिनेत्र्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करतात.

(हे वाचा-'शिक्षकांचे प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे कसे सुटणार?' डिसले गुरूजी झाले भावुक)

प्रियांका चोप्राने तिच्या 'अनफिनिश्ड' या बायोग्राफीमध्येही या मुद्दावर ठळकपणे भाष्य केलं आहे. यामध्ये तिनं लिहिलं की, 'दक्षिण आशियामध्ये फेअरनेस क्रीमची जाहिरात करणं खूप सामान्य गोष्ट आहे. कारण फेअरनेस क्रिमचा व्यावसाय खूप मोठा असून अशाप्रकारच्या जाहिराती अनेकजण करतात. अशा जाहिरांतीबाबत दोन विचारप्रवाह आहेत. काहींना अशा जाहिराती करण्यात काहीही गैर वाटत नाही. पण आता लोकांमध्ये जागरुकता वाढत आहे. अशाप्रकारच्या जाहिराती करणं माझ्यासाठी वाईट होतं. कारण मी लहान असताना गोरं दिसण्यासाठी टॅल्कम पावडर लावायची, कारण त्यावेळी 'त्वचा सावळी असणं म्हणजे वाईट असणं' असं मला वाटायचं.

प्रियांकाने 2015 पासून अशाप्रकारच्या जाहिराती करणं बंद केलं आहे. प्रियांकाच्या घरात तिची सर्व भावंडं तिच्यापेक्षा गोरी आहेत. त्यामुळे तिला लहानपणी तिच्या भावंडांकडून चेष्टेत काळी, काळी म्हणून चिडवलं जायचं. या गोष्टीचं तिला वाईट वाटायचं. मात्र तिने आता फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करणं बंद केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Priyanka chopra