जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'रमजान महिन्यात नोरा फतेहीने परिधान केला बोल्ड ड्रेस, पाहून भडकले नेटकरी

'रमजान महिन्यात नोरा फतेहीने परिधान केला बोल्ड ड्रेस, पाहून भडकले नेटकरी

'रमजान महिन्यात नोरा फतेहीने परिधान केला बोल्ड ड्रेस, पाहून भडकले नेटकरी

आतापर्यंत अनेक परदेशी कलाकारांनी भारतात येऊन बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं नशीब आजमवलं आहे. यामध्ये कतरिना कैफ, नर्गिस फाखरी, फवाद खान अशा अनेक कलाकारांचा समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे कॅनडियन अॅक्टर आणि डान्सर नोरा फतेहीचं (Nora Fatehi). बॉलिवूडची डान्सिंग क्वीन (Dancing Queen) अशी ओळख नोराला मिळाली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 29 एप्रिल-   आतापर्यंत अनेक परदेशी कलाकारांनी भारतात येऊन बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं नशीब आजमवलं आहे. यामध्ये कतरिना कैफ, नर्गिस फाखरी, फवाद खान अशा अनेक कलाकारांचा समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे कॅनडियन अॅक्टर आणि डान्सर नोरा फतेहीचं (Nora Fatehi). बॉलिवूडची डान्सिंग क्वीन (Dancing Queen) अशी ओळख नोराला मिळाली आहे. नोरा फतेही सोशल मीडियावरही (Social Media) खूप अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा ग्लॅमरस आणि हॉट फोटोशूटसह (Hot Photoshoot) चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देताना दिसते. तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी (Fashion Statement) लाखो चाहते तिला फॉलो करतात. नुकताच नोराचा एक लेटेस्ट एअरपोर्ट लूक (Airport Look) इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे लोकांनी नोराला ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली आहे. नोरानं आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ एअरपोर्टवरील आहे. नोराचा एअरपोर्ट लूक खूपच क्लासी होता. ‘साकी-साकी’ गर्ल नोरानं फ्लोरल ब्लॅक स्कर्ट (Floral Black Skirt) आणि फ्लोरल ब्लाउज घातलेला आहे. केस मोकळे सोडलेले असून, डोळ्यांवर सनग्लासेस (Sunglasses) लावलेले आहेत. या लूकसह एअरपोर्टवर आलेल्या नोराचे मीडियानं फोटो काढण्यास सुरुवात केली. जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर आले तेव्हा तिचा हा क्लासी लूक (Classy Look) अनेकांना आवडला नाही. सध्या पवित्र रमजानचा महिना (Ramadan Month) सुरू असूनही नोरानं रिव्हिलिंग कपडे (Revealing Clothes) घातल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

    जाहिरात

    नेटिझन्सनी नोराच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट्स (Comments) केल्या आहेत. एका युजरनं विचारलं आहे, ‘ही मुस्लिम नाही का?’ तर एकानं कमेंट केली आहे, ‘रमजानचा महिना सुरू असल्याचं नोरा फतेहीला माहीत आहे का?’ आणखी एका यूजरनं कमेंट केली आहे की, हिला लाज वाटली पाहिजे. एका युजरनं तिच्या सनग्लासेसवर टीका केली आहे. सायंकाळच्यावेळी सनग्लासेस कोण वापरतं? असा प्रश्न त्या युजरनं विचारलं आहे.

    वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, आपल्या आयटम नंबर्सनी चाहत्यांची मनं जिंकणारी नोरा फतेही सध्या ‘डान्स दिवाने ज्युनिअर्स’ (Dance Deewane Juniors) हा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमजज करत आहे. नोरासोबत नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्जीदेखील जजिंग करत आहेत. करण कुंद्रा हा शो होस्ट करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात