जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / एक वर्षसुद्धा नाही टिकलं पहिलं लग्नं; खुपचं बेचव होतं या लग्नाचं कारण : नीना गुप्ता

एक वर्षसुद्धा नाही टिकलं पहिलं लग्नं; खुपचं बेचव होतं या लग्नाचं कारण : नीना गुप्ता

एक वर्षसुद्धा नाही टिकलं पहिलं लग्नं; खुपचं बेचव होतं या लग्नाचं कारण : नीना गुप्ता

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या आपल्या ‘सच कहूं तो’ (Sach Kahun Toh) या आत्मचरीत्रामुळे चांगल्याच चर्चेत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या आपल्या ‘सच कहूं तो’ (Sach Kahun Toh) या आत्मचरीत्रामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. नीना याचं हे पुस्तक बॉलिवूडची बेबो करीना कपूरने वर्चुअली प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात नीना यांनी असे एक एक खुलासे केले आहेत, की ज्यामुळे खळबळ माजली होती. या पुस्तकात त्यांनी आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. तसेच त्यांनी अमलान घोष यांच्यासोबतच्या त्या पहिल्या लग्नाचं बेचव कारणही सांगितलं आहे.

जाहिरात

नीना गुप्ता यांनी पुस्तकात लिहिलं आहे. ‘त्या इंटर कॉलेजच्या एका कार्यक्रमादरम्यान अमलान घोषला भेटल्या होत्या. अमलान आयआयटी दिल्लीमध्ये शिकत होता. दोघे हॉस्टेल कॅम्पस किंवा किंवा घराजवळ एकेमकांना चोरून भेटत असत’. (हे वाचा: HBD: सलमान आणि रणबीर कपूरला सोडून कतरिना विक्की कौशलशी करणार लग्न? ) नीना यांनी आपल्या पुस्तकात पुढं म्हटलं आहे, ‘अमलानचे आईवडील दुसऱ्या शहरामध्ये रहात होते. मात्र त्याचा दादा माझा शेजारी होता. त्यामुळे दोघांना भेटण्याची संधी मिळत असे. तसेच दोघांनी अनेक सण आणि सुट्टीचा काळसोबत घालवला आहे. नीना यांनी म्हटलं आहे, की त्यांना बॉयफ्रेंडसाठी सक्त मनाई होती. मात्र हा अनुभव खुपचं रोमांचक होता. आम्ही दोघे कधीही लॉंग ड्राईव्हवर निघून जात. तसेच आम्ही आयआयटी कॅम्पसमध्ये खूप वेळ सोबत घालवला आहे’. (हे वाचा: HBD: लहानपणीच वडिलांनी सोडली साथ; 6 भावंडांसह कतरिना कैफला आईने असं वाढवलं   ) तसेच नीना यांनी म्हटलं आहे, ‘आईपासून बरेच दिवस हे नात लपवल्यानंतर मी या नात्याबद्दल खुपचं गंभीर झाले होते. त्यांनतर मी आईला आमच्या नात्याबद्दल सर्वकाही सांगितलं. कारण आम्ही आमच्या नात्याबद्दल खुपचं गंभीर होतो. आई या नात्याबद्दल खुश नसतानाही आम्ही दोघांनी लग्न केलं होतं’. तसेच अमलानसोबत लग्नाबद्दल सांगताना त्या म्हणतात, ‘अमलान आणि त्यांच्या मित्रांनी श्रीनगर सुट्टीचा प्लन केला होता. मात्र त्यांच्या आईंनी म्हटलं होतं, की अमलानसोबत लग्न झाल्यावरच तू त्याच्यासोबत कुठेही जाऊ शकतीस’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात