आज बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 16 जुलै 1983 मध्ये हॉन्गकॉन्ग येथे झाला होता. ती मूळ एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे.वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास
मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कॅटरीना कैफचं नाव सध्या अभिनेता विकी कौशलसोबत जोडलं जात आहे. गेली दोन वर्षे ती नात्यात असल्याचं म्हटलं जातंय.
नेहमीच सिंपल राहणाऱ्या कॅटरीना कैफवर बॉलिवूड दबंग सलमान खानसुद्धा फिदा होता. इतकच नव्हे तर सलमानने तिला 'मैने प्यार क्युं किया' चित्रपटातसुद्धा काम दिलं होतं.
सलमान आणि कॅटरीनाच्या नात्याच्या खुपचं जोरदार चर्चा होत्या. इतकचं नव्हे तर या दोघांच्या लग्नाचासुद्धा अंदाज बांधला जात होता.
त्यांनतर तिने 'अजब प्रेम की गजब कहानी' मध्ये रणबीर कपूरसोबत काम केलं होतं. या दोघांची जोडी हिट ठरली होती. त्यांनतर या दोघांचं अफेयर सुरु झालं होतं. रणबीर आणि कॅटरीनाच्या लग्नाच्या चर्चासुद्धा सुरु होत्या. मात्र तिचा रणबीरसोबतही ब्रेकअप झाला होता.
सध्या कॅटरीनाचं नाव अभिनेता विक्की कौशलसोबत जोडलं जातं आहे. हे दोघे 2 वर्षांपासून नात्यात असल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच चाहते आत्ता यांच्या लग्नाची अपेक्षा करत आहेत.