मुंबई, 1 जून- ‘रेहना है तेरे दिल मे’(Rahna Hai Tere Dil Mai) या चित्रपटातून ‘मॅडी’ (Maddy) ने सर्व तरुणींना अक्षरशः वेड लावलं होतं. आजही लाखो तरुणी ‘मॅडी’ वर फिदा आहेत. मात्र मॅडी म्हणजेच अभिनेता आर. माधवन(R. Madhavan) ज्या मुलीच्या प्रेमात पडला होता, आज ती मुलगी त्याची पत्नी आहे. माधवनने आपल्या विद्यार्थिनीशीचं लग्न केलं होतं. आज आर. माधवन आपला 50 वा वाढदिवस (50th Birthday) साजरा करत आहे. त्यानिमित्ताने पाहूया त्याच्या या अनोख्या लव्हस्टोरीबद्दल.
View this post on Instagram
आर. माधवन चा जन्म 1 जून 1970 मध्ये बिहारमधील, जमशेदपूर येथे झाला होता. सुरुवातीपासूनचं आर माधवन अभ्यासात खुपचं हुशार आणि जिज्ञासू मुलगा होता. इंजीनीअरींगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखे क्लासेस घायला सुरुवात केली होती.
(हे वाचा:विश्वास ठेवा तुम्हाला सर्वकाही शक्य आहे’; अमृता खानविलकरनं दिला Fitness Mantra )
यावेळी सरिता नावाची एक मुलगी जिला एयरहोस्टेस व्हायचं होतं. आणि ती क्लासेससाठी महाराष्ट्रात आली होती. तिने आर. माधवनकडे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास जॉईन केलं होतं. याच दरम्यान माधवनला तिची ही विद्यार्थीनी आवडू लागली होती. क्लास पूर्ण झाल्यानंतर आभार मानण्यासाठी सरिताने माधवनला डिनरसाठी विचारलं. आणि त्याने त्या संधीचा फायदा घेत सरिताला थेट प्रपोज केलं. आणि त्याला लग्नासाठी विचारणा केली. आणि पुढे या दोघांचं लग्नदेखील झालं. आणि त्यांना एक मुलगा देखिल आहे.
(हे वाचा: मदतीसाठी पुढे सरसावले मराठी कलाकार; स्वप्निल जोशीन गरजुंना केली मोठी मदत )
आर. माधवनच्या आगळ्या वेगळ्या लव्हस्टोरीबद्दल फारचं कमी लोकांना माहिती आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही या दोघांमध्ये तितकचं प्रेम पाहायला मिळत. हे दोघेही एकमेकांना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करत असतात. प्रत्येक गोष्टीत एकमेकांच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे त्यांचा संसार दिवसेंदिवस जास्तचं बहरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment