जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'खरंच खूप खूप अभिमान वाटतो...''बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'खरंच खूप खूप अभिमान वाटतो...''बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'खरंच खूप खूप अभिमान वाटतो...''बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'खरंच खूप खूप अभिमान वाटतो...''बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

बाईपण भारी देवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ना कुठलं हॅण्डसम हिरो ना कुठली सुंदर अभिनेत्री तरीही या चित्रपटाने 18 दिवसांत 62 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जुलै- केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 60 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. अनेक सेलेब्स या चित्रपटाबद्दल भरभरून कौतुक करताना दिसतात. आता एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनं या चित्रपटातं कौतुक केलं आहे. शिवाय हा चित्रपट पाहा अशी विनंती देखील केली आहे. नुकतंच अभिनेत्री मृणाल ठाकूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याबरोबर तिने या चित्रपटाचे कौतुकही देखील केलं आहे. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बाईपण भारी देवा, कसला कमाल चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. अनेकजण म्हणतात, की हल्ली चांगले चित्रपट कुठे बनतात? त्यांना सांगावेसे वाटते बनतात बॉस!! गेल्या पाच आठवड्यांपासून हा चित्रपट चित्रपटगृहात हाऊसफुल सुरु आहे. नुकतंच हैदराबादमध्ये हा चित्रपट पाहिला, तो देखील हाऊसफुल शो होता. खरंच खूप खूप खूप अभिमान वाटतो. नक्की बघा, असे मृणालने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वाचा- नऊवारी काष्ठी पातळ अन् 80 वर्षांच्या आजींची सुकन्या मोनेबरोबर भन्नाट फुगडी,video बाईपण भारी देवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ना कुठलं हॅण्डसम हिरो ना कुठली सुंदर अभिनेत्री तरीही या चित्रपटाने 18 दिवसांत 62 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे.लेखिका वैशाली नायक यांच्या या कथेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कथेत हिंमत असेल तर ती नायिकेचे सौंदर्य आणि सस्पेन्स नसतानाही प्रेक्षकांची मने जिंकू शकते.30 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट फक्त 5 कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने भारतात 50 कोटींची कमाई केली आहे.त्याचबरोबर या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 62 कोटींच्या वर पोहोचले आहे. एवढेच नाही तर एका दिवसात 6.10 कोटींचा गल्ला जमवणारा हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सिंगल डे कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे.

News18

या चित्रपटाला IMDB वर 10 पैकी 8.9 रेटिंग देण्यात आली आहे. चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली आहे. पाच बहिणींची कथा असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत 5 ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. या कथेत पाचही बहिणी एका स्पर्धेत भाग घेतात. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे.

News18

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवली आहे. यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात