जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी? 'या' चित्रपटाची होतेय निर्मिती

दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी? 'या' चित्रपटाची होतेय निर्मिती

दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी? 'या' चित्रपटाची होतेय निर्मिती

बॉलिवूडची(Bollywood) मस्तानी म्हणून ओळख असणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Paukone) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑगस्ट- बॉलिवूडची(Bollywood) मस्तानी म्हणून ओळख असणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Paukone) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. दीपिकाने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा कस दाखवून दिला आहे. आधुनिक असो किंवा ऐतिहासिक भूमिका, दीपिकाने या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे. आगामी काळात दीपिका अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. मात्र नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार दीपिका द्रौपदी बनणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, प्रसिद्ध लेखिका अनुजा चंद्रमौलीने म्हटलं आहे,  एका चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. हा चित्रपट राणी जिंदानच्या एका पुस्तकावर आधारित आहे. आणि यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार असल्याचंदेखील म्हटलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच उत्सुकता निर्माण झाली आहे. (हे वाचा: सारा अली खान आणि विकी कौशलच्या चाहत्यांना झटका! बनणार नाही हा बिग बजेट सिनेमा? ) तसेच पुढे दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ‘द लास्ट क्वीन’ या पुस्तकावर आधारित असणार आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका असली, तरी मुख्य अभिनेत्यासाठी अजून कोणालाही निश्चित करण्यात आलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. मेकर्सकडून अजूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. मात्र दीपिकाला द्रौपदीसारख्या दमदार भूमिकेत पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक झाले आहेत. (हे वाचा: ‘दीदी चूक मान्य केलात तर…’, VIDEO शेअर करत शर्लिन चोप्राचा शिल्पावर हल्लाबोल ) याबद्दल बोलताना लेखिका अनुजा चंद्रमौलीनं म्हटलं आहे, ‘मला आनंद आहे माझ्या पुस्तकाच्या राईटसची विक्री झाली आहे. दिग्दर्शकाने कोणत्याही कलाकारांना घेतल्यास मला आनंदचं होईल. मात्र त्या कालाकाराने ही भूमिका अत्यंत मनापासून जगावी अशी माझी इच्छा आहे. ही एका अत्यंत दमदार भूमिका आहे, त्यामुळे त्याला योग्य तो न्याय मिळावा हिच अपेक्षा आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने अनेक दमदार भूमिका आत्तापर्यंत निभावल्या आहेत, त्यामुळे या भूमिकेसाठी दीपिकाचा विचार करणं योग्य आहे’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात