जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मल्लिका शेरावतने कमला हॅरिस यांच्याबाबत केलेलं भविष्य खरं ठरलं? 11 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

मल्लिका शेरावतने कमला हॅरिस यांच्याबाबत केलेलं भविष्य खरं ठरलं? 11 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

मल्लिका शेरावतने कमला हॅरिस यांच्याबाबत केलेलं भविष्य खरं ठरलं? 11 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) कमला हॅरिस यांचं भविष्य तब्बल 11 वर्षांपूर्वी ट्विट केलं होतं. त्यावेळी कमला हॅरिस सॅन फ्रन्सिस्कोच्या (San Francisco) District Attorney होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 नोव्हेंबर : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भारतभर मोठी चर्चा आहे. कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष (Vice President) म्हणून निवडून येणाऱ्या पहिला महिला आहेत. कमला हॅरिस यांच्या या विजयामुळे, बॉलिवूडपासून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होण्यापूर्वीच बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने चक्क 2009 मध्येच कमला हॅरिस यांचं भविष्य सांगितलं होतं. आता ते भविष्य जवळपास खरं ठरल्याने ते सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) कमला हॅरिस यांचं भविष्य तब्बल 11 वर्षांपूर्वी ट्विट केलं होतं. त्यावेळी कमला हॅरिस सॅन फ्रन्सिस्कोच्या (San Francisco) District Attorney होत्या. मल्लिकाने, कमला हॅरिस एक दिवस ‘अमेरिकी राष्ट्रपती’ बनण्याचं ट्विट केलं होतं. तिने केलेलं हे ट्विट नेटकऱ्यांकडून चांगलंच व्हायरल होत असून, त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

जाहिरात

मल्लिकाने हे ट्विट 23 जून 2009 मध्ये केलं होतं. त्यात तिने लिहिलं होतं, ‘एका फॅन्सी कार्यक्रमात एका अशा महिलेशी मस्ती करणं, जी यूएसची राष्ट्रपती होऊ शकते, कमला हॅरिस’. मल्लिकाच्या या ट्विटने अनेक जण हैराण आहेत. तिच्या या ट्विटमुळे तिची तुलना जोफ्रा आर्चरशी होते आहे. अनेक नेटकऱ्यांनी ती महिलांची जोफ्रा आर्चर असल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात
जाहिरात

दरम्यान, जोफ्रा आर्चरने 6 वर्षांपूर्वी एक अशाच प्रकारचं ट्विट केलं होतं. ज्या ट्विटमध्ये त्याने केवळ ‘जो’ इतकाच शब्द लिहिला होता. अमेरिकी राष्ट्रपती म्हणून जो बायडन यांची निवड झाल्यानंतर, जोफ्रा आर्चरचं हे ट्विट जबरदस्त व्हायरल झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात