मुंबई, 05 मे : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सुद्धा बरीच अॅक्टिव्ह असते. प्रत्येक विषयावर आपलं मत व्यक्त करत असते. मात्र कंगनाचा हा अतिउत्साहीपणा तिला नडल्याचं दिसतं. कंगनाच्या काही आक्षेपार्ह विधानांमुळे ट्विटरने तिला काल कायमचं सस्पेंड केलं (Kangana Suspend On Tweeter) आहे. कंगनाने बंगाल हिंसाचाराबाबत TMC (तृणमूल काँग्रेस) वर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे ट्विटरने कंगनाचं अकाऊंट कायमचं बॅन केलं आहे. यानंतर स्वदेशी अॅप KOO ने कंगनाच्या बाजूने यात उडी घेतली आहे.
ट्विटरच्या म्हणण्यानुसार, कंगनाला वारंवार सांगूनसुद्धा तिनं नियमांचं उल्लघंन केलं आहे आणि त्यामुळेच ट्विटरने हे कठोर पाऊल उचललं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगना आधी तिची बहीण रंगोली चंदेलला सुद्धा ट्वीटरवर बॅन करण्यात आलं आहे. अशातच ट्विटरला स्वदेशी पर्याय असणाऱ्या ‘KOO’ ने कंगनाचं स्वागत केलं आहे. KOO चे CEO आणि सहाय्यक संस्थापक अप्रमेय राधाकृष्णन यांनी कंगनाच्या KOO पोस्टचं स्क्रीनशॉट काढत सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
हा स्क्रीनशॉट शेयर करत राधाकृष्णन यांनी कंगनाचं स्वागत केलं आहे. कंगनाची ही पोस्ट थोडी जुनी आहे. मात्र राधाकृष्णन यांनी ती आता पोस्ट केली आहे आणि त्यासोबतचं म्हटलं आहे. ‘कंगनाचं हे पहिलं KOO आहे. खरंतर हे कंगनासाठी स्वतःचं घर असल्यासारखं आहे आणि इतर सर्व माध्यमांना ती भाड्याचं घर समजते आणि ते अगदी बरोबर आहे.
हे वाचा - कंगना रनौत ट्वीटरवर सस्पेंड होताच, सोशल मीडियावर 'मीम्स'चा पाऊस
कंगना रणौत अनेक दिवसांपासून ट्विट सोबतच ‘कू’ वरसुद्धा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे. बाकी काही असलं तरी कंगनाच्या चाहत्यांना हे ऐकून आनंद झाला आहे. ट्विटर नाही तर कूच्या माध्यमातून तरी आपण कंगनाच्या संपर्कात राहू शकतो असा दिलासा चाहत्यांना आहे. कंगना कू वरसुद्धा चांगलीच अॅक्टिव्ह आहे. त्यावरसुद्धा तिच्या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Kangana ranaut, Koo App, Tweet