जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कंगना रनौत ट्वीटरवर सस्पेंड होताच, सोशल मीडियावर 'मीम्स'चा पाऊस

कंगना रनौत ट्वीटरवर सस्पेंड होताच, सोशल मीडियावर 'मीम्स'चा पाऊस

कंगना रनौत ट्वीटरवर सस्पेंड होताच, सोशल मीडियावर 'मीम्स'चा पाऊस

Bollywood actress कंगना रनौतला ट्वीटरवरून कायमचं सस्पेंड करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मे : बॉलीवूडमधील (Bollywood) ‘पंगा क्वीन’ (Panga queen) समजली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. कंगना सतत कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे वादात येत असते. कंगना प्रत्येक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्यांवर भाष्य करत असते. अनेकवेळा ती आपल्या विधानामुळे ट्रोलदेखील होतं असते. मात्र आजचं ट्वीट कंगनाला चांगलचं महागात पडलं आहे. कंगनाने बंगाल हिंसाचारावर ट्वीट करत TMC(तृणमूल काँग्रेस) वर गंभीर आरोप देखील केले होते. कंगनाचं हे ट्वीट आक्षेपार्ह असल्याने तिला ट्वीटरवरून कायमचं सस्पेंड करण्यात आलं आहे. कंगनाला सस्पेंड करता0च सोशल मीडियावर मीम्सचा(Memes) अक्षरशः पाऊस होतं आहे.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

कंगना रनौतने काही दिवसांपूर्वीच आपलं ट्वीटर अकाऊंट स्वतः हाताळायला घेतलं होतं. त्यांनतर ती प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडत होती. अनेक बाबतीत तिखट टीकाही करत होती. नुकताच कंगनाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या विजयानंतर अनेक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. कंगनाने बंगाल हिंसाचाराचा मुद्दा मांडत ‘तृणमूल काँग्रेस’ वर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कंगनाला सोशल मीडियावरून कायमचं सस्पेंड करण्यात आलं आहे. कंगनाला सस्पेंड करताच सोशल मीडियावर विविध मजेशीर अशा मीम्सचा अक्षरशः पाऊसचं होतं आहे असं म्हणावं लागेल. (हे वाचा: कंगना सोनू सूदवर जळते? कंगनाच्या ‘त्या’ कृत्याने सोशल मीडियावर चर्चांना आलं उधाण ) कंगनाने एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये तिनं बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर पीएम मोदी यांना 2000 सालच्या रुपात यायला सांगितलं होतं. युजर्सने याला गुजरात हिंसेशी जोडून हिंसाचार पसरवणारा ट्वीट म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात