मुंबई, 12 जून- सध्या सगळीकडं जोरात लग्नसराई आहे, बॉलिवूडमध्ये देखील यंदा अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. नुकतचं निर्मात मधु मंटेना याने लग्न केलं आहे. शिवाय सनी देओलचा मुलाच्या लग्नाची देखील बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. हे सगळं खरं असलं तरी आता बॉलीवूडची क्वीन आपली कंगना देखील लग्नासाठी तयार आहे? खरचं तिनं नवरा शोधला आहे का..कोण आहे तो? असे प्रश्न मनात येण्यामागं देखील एक कारण आहे कारण पॅप्सनं जेव्हा तिला लग्नाविषयी प्रश्न विचारला तेव्हा तिनं थेट निमंत्रण पत्रिका दिली आणि म्हणलं लग्नाला या हं….! कंगना रनौत नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असते. लग्नाबद्दल बोलताना तिने पॅप्सला कार्ड दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला जाणून घेऊया… वाचा- सैफ अली खानला वाटतेय कसली भीती? आदिपुरूषच्या प्रमोशनमध्ये कुठेच दिसला अभिनेता व्हिडिओ होतोय व्हायरल कंगना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगनाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यानंतर लोक प्रश्न विचारत आहेत की कंगना लग्न करणार आहे का? खरं तर सेलिब्रिटी पॅप विरल भयानीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाच्या कार्यालयाबाहेर माध्यमांची गर्दी दिसत असून बॅकग्राऊंड एकदम सजलेलं दिसत आहे.
नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय आहे? व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर म्हणत आहे की, “जसं तुम्ही पाहू शकता की कंगना रनौतचं ऑफिस नववधूसारखं सजवलं आहे, त्यामुळे कंगना रनौत अखेर लग्न करणार आहे हे खरं आहे का?” तितक्यात कंगना कारमधुन एंट्री घेते आणि जेव्हा मीडियाने कंगनाला विचारले की, लग्नाबाबत बातमी खरी आहे का तेव्हा ती म्हणते की, बातमी तर तुम्ही पसरवतात, मी फक्त एक चांगली बातमी देतो. तुम्ही सगळे नक्की याल.
लग्न कंगनाचं नाही तर ‘टीकू आणि शेरू’चं आहे अभिनेत्रीने पॅप्सला दिलेल्या कार्डवर ‘टिकू वेड्स शेरू’ असं लिहिलं होतं. खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून कंगना रनौत तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनत असलेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. हा चित्रपट 23 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे, तर या चित्रपटाची निर्मिती कंगनाने केली आहे. कंगना या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे.