Home /News /entertainment /

Sooryavanshi: चित्रपटाचं पहिलं गाणं 'Aila Re Aillaa'रिलीज; अक्षय-रणवीर-अजय त्रिकुटाची दिसली धम्माल

Sooryavanshi: चित्रपटाचं पहिलं गाणं 'Aila Re Aillaa'रिलीज; अक्षय-रणवीर-अजय त्रिकुटाची दिसली धम्माल

रणवीर सिंग, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी या गाण्यात एकत्र जोरदार डान्स केला आहे. 'आयला रे आयल्ला' हे गाण रिलीज होताच यूट्यूबवर हिट झालं आहे.

  मुंबई,21ऑक्टोबर-  बॉलिवूड(Bollywood) अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif) स्टारर 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) दिवाळी 2021 ला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गेल्या वर्षी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 2 वेळा पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी चित्रपटासह मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहेत. संपूर्ण टीमने धमाकेदार प्रमोशनसह सुरुवात केली आहे. दरम्यान, निर्मात्यांनी 'आयला रे आयला' हे पहिले गाणे रिलीज केले आहे. अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह हे त्रिकूट लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  रणवीर सिंग, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी या गाण्यात एकत्र जोरदार डान्स केला आहे. 'आयला रे आयल्ला' हे गाण रिलीज होताच यूट्यूबवर हिट झालं आहे. हे गाणं अक्षय कुमारच्या 'खट्टा मीठा' चित्रपटातील आहे, जे निर्मात्यांनी एका नवीन ट्विस्टसह सादर केलं आहे.गाण्याचे बोल 'खट्टा मीठा' च्या त्याच शीर्षकाच्या गाण्यातून घेतले गेले आहेत, परंतु पूर्णपणे नाही. या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले असून ते दलेर मेहंदी यांनी गायिलं आहे. त्याचबरोबर तनिष्क बागचीने गाण्याच्या संगीतात बदल केलं आहे. गाणं रिलीज होताच अक्षयने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. अक्षयने लिहिल आहे, 'जेव्हा सूर्यवंशी, सिंघम आणि सिम्बा एकत्र येत आहेत, हे एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही.#AilaReAillaa', नुकताच (हे वाचा:चित्रपटगृहे उघडताच मल्टिप्लेक्सनं दिलं मोठं गिफ्ट! देत आहेत FREE मूव्ही TICKET) कतरिना कैफ आणि चित्रपट निर्माते रोहित शेट्टी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगच्या शो 'द बिग पिक्चर' च्या स्टेजवर पोहोचले होते, तिथे त्यांनी खूप मजा केली. यापूर्वी हा चित्रपट 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोविडमुळे चित्रपटगृहे कायमस्वरूपी बंद झाली, ज्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्रात 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे उघडण्याची घोषणा केल्यानंतर रोहित शेट्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय देवगण आणि रणवीर सिंह या चित्रपटात छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Akshay Kumar, Entertainment

  पुढील बातम्या